नीरा खोऱ्यात पावसाचे प्रमाण वाढले. चारही धराणातून विसर्ग वाढवला.
पुरंदर दि.१६
राज्यात गेली काही दिवस दमदार पावसाने बँटींग केली आहे. त्यामुळे नीरा खोऱ्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो होत आहेत. क्षमतेपेक्षा धरणात पाणी येण्याचे प्रमाण ही वाढत आहे, परिणामी धरणातून पाणी सोडण्याचा वेग वाढवावा लागत असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. शुक्रवारी वीर धरणातून नीरा नदिच्या पात्रात तब्बल ४३ हजार ७३३ क्युसेक्सने विसर्ग सुरु असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.
शुक्रवार दि.१६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून निरा खोऱ्यातील धरणातून पाण्याच विसर्ग वाढवला आहे. भाटघर धरणातून ७ हजार क्युसेक्सने, निरा-देवघर ३ हजार ३१६ क्युसेक्सने, गुंजवणी धरणातून १ हजार ७८० क्युसेक्सने तर विर धरणातून ३४ हजार ४५९ क्युसेक्सने पाणी नीरा नदीच्या पात्रात सोडले जात होते. त्यानंतर दिवसभरात नीरा खोऱ्यातील धरण साखळीत पाण्याचे प्रमाण वाढते राहिल्याने सायंकाळी ०५ वाजल्या नंतर चारही धराणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. भाटघर धरणातून ११ हजार ८०० क्युसेक्सने, निरा-देवघर धरणातून ०५ हजार ०६० क्युसेक्सने, गुंजवणी धरणातून १ हजार ७८० क्युसेक्सने तर वीर धरणाच्या सर्वच्या सर्व नऊ मोऱ्यातून तब्बल ४३ हजार ७३३ क्युसेक्सने विसर्ग सुरु असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.