वीर धरणातून नीरा नदी पात्रात पणी सोडले : नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
नीरा दि.९
पुरंदर तालुक्यातील नीरा नदीवर असलेल्या वीर धरणातून नीरा नदी पात्रात आज सकाळपासून पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली असून नीरा नदी पात्रात पात्रात 5737 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्या येत असल्याचे माहिती पाठबंधारे विभागाने दिली आहे.
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.यापूर्वीच धरण 99.27 टक्के भरले आहे.त्यामुळे आता वीर धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.आज सकाळी 9 वाजल्या पासून धरणाच्या सांडव्यातून 4637 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. तर वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन 800 क्यूसेक व डावा कालवा विद्युतगृहातुन 300 क्यूसेक विसर्ग नदीपत्रात सुरू आहे.सध्या नीरा नदीपत्रात एकूण 5737 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.तसेच पावसाच्या प्रमाणानुसार या विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नदी काठच्या लोकांनी नोंद घ्यावी व नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असा सर्तकतेचा इशारा पाठबंधारे विभागाने दिला आहे.