सासवड ते दिवे घाट परिसरात ढगफुटी सदृश पाऊस
सासवडच्या आचार्य अत्रे वेध शाळेत 102 मिलिमीटर पावसाची नोंद
सासवड दि.४
पुरंदर तालुक्यात आज जोरदार पाऊस झाला आहे.तालुक्यात बहुतांश भगात हा पाऊस झाला असून सासवड ते दिवे घाट या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.साधारण दोन ते आडीच तास हा पाऊस पडत होता.
आज झालेल्या पावसाची नोंद सासवड येथील आचार्य अत्रे वेध शाळेत घेण्यात आली आहे.सासवड मध्ये दोनंतासात १०२ मिलिमीटर पावसाची नोंद माहिती नितीन यादव यांनी दिली आहे.
त्यांनी दिलेल्या माहिती नुसार तालुक्यात
जानेवारी २०२२ ते आज अखेर पुरंदर तालुक्यातील एकुण ३११.०२मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जुन महिन्यात ६८.७ मिलीमीटर पाऊस झाला
जुलै महिन्यात ११९.७ मिलीमीटर पाऊस झाला
ऑगस्ट मध्ये मागील चार दिवसात १२४ मिलीमीटर पाऊस झाला तर आज विक्रमी म्हणजे १०२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाल्याची श्यकताता व्यक्त केली जात आहे. अद्याप कोणतीही अप्रिय घटना घडल्याची माहिती मिळून आली नाही.