अशैक्षणिक कामे बंद करा- महादेव माळवदकर पाटील
शिक्षक समिती पुरंदर व दौंड शाखेच्या वतीने शिक्षक , शाळा व विद्यार्थी यांच्या विविध मागण्यासाठी प्रांत कार्यालय एक दिवसीय धरणे आंदोलन
सासवड दि. 8
विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम करणारी
अशैक्षणिक कामे बंद करा. आम्हाला मुलांना शिकवू द्या अशी आर्त मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संपर्कप्रमुख महादेव माळवदकर पाटील यांनी केली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभर शिक्षक , शाळा व विद्यार्थी यांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्या यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.शिक्षक समिती पुरंदर व दौंड शाखेच्या वतीने पुरंदर येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी श्री. माळवदकर बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती संपर्कप्रमुख महादेव माळवदकर पाटील, दौंड तालुका प्राथमिक शिक्षक समिती अध्यक्ष शशिकिरण मांढरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विश्वनाथ कौले, शिक्षकनेते सुनील कुंजीर, सुनील लोणकर, प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव गट अध्यक्ष संदीप कदम, पुणे जिल्हा शिक्षक समिती पतसंस्था चेअरमन मनोज दीक्षित, पुरंदर तालुका शिक्षक समिती कोषाध्यक्ष पंढरीनाथ काळे, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था संचालक गणेश कामठे, मनोज सटाले, सुरेश जगताप, सुनील जगताप, भाऊसाहेब बरकडे,दौंड तालुका शिक्षक समिती सरचिटणीस
बापूराव खळदकर,कोषाध्यक्ष, संजय गवळी , पुरंदर शिक्षक पतसंस्था माजी सभापती रविंद्र जाधव,आजिनाथ खेडकर, सुरेश गायके ,संजय जाधव,संभाजी लवांडे,मोहन खराडे,राजकुमार मोरे,चंद्रकांत काकडे,प्रवीण कुंजीर आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रशिक्षण संस्था डायटचा
प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत होणारा अतिरेक त्वरित थांबवावा,जुनी पेन्शन लागू करावी , सर्व मुलांना मोफत गणवेश मिळावा , सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दुर कराव्यात , केंद्र प्रमुख पदे भरावीत , एम. एस. सी.आय.टी. मुदत वाढ मिळावी , पगार एक तारखेस करावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जय शिक्षक समिती आदींसह विविध घोषणांनी पुरंदर प्रांत कार्यालय परिसर दणाणून गेला.
यावेळी शशिकिरण मांढरे, विश्वनाथ कौले संजय जाधव, महादेव माळवदकर पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील कुंजीर यांनी केले. सूत्रसंचालन गणेश कामठे यांनी केले.तर आभार सुनील लोणकर यांनी मानले.