पिंगोरी येथे बिबट्याने रात्रभर मांडला शेतकऱ्याच्या दारात ठीया. : शेतकरी झाले भयभित
पिंगोरी दि.३
पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे आता बिबट्याचे धाडस वाढत चालले आहे.गेली 10 वर्ष या भागात बिबट्याचे वास्तव्य आहे.या भागात अनेक वन्य प्राणी वास्तव्यास असतात. मात्र हे प्राणी मानवीवस्ती पासून नेहमीच दूर असतात. सोमवार पासून बिबट्याने लोकवस्ती जवळ ठीया मांडला आहे.
काल मंगळवारी रात्री बिबट्या ने पिंगोरी येथील बाग वस्तीत असलेल्या घरा समोर झाडीत बसून रात्र घालवली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आता वाढ झाली आहे. डोंगरावर चरायला गेलेल्या पाळीव प्राण्यावर बिबट्या हल्ला करीतच आहे. आता शेतकऱ्याची गोठ्यातील जनावरे सुद्धा असुरक्षित झाली आहेत. काल रात्री, रात्रभर बिबट्या घरा समोर असल्याने लोकांना घरातून बाहेर पडता येत नव्हते. त्यातूनही येथील तरुणांनी या बिबट्याचे व्हिडिओ चित्रण केले असून रात्रीच्या अंधारात बिबट्या असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. बिबट्या आसपास असल्यास फटाके वाजवावेत.रात्रीच्या वेळी घरा बाहेरील लाईट बंद करू नये. गुरांच्या गोठ्याला तारांचे किंवा कट्याचे कुंपण करावे असे त्यांनी म्हटले आहे.
" गेली १० वर्षा पासून आम्ही वन्य प्रण्या सोबत जगात आहोत. गावातील लोकही या बाबत कोणत्याही तक्रारी करीत नाहीत.पण आता या भात बिबट्यांची संख्या वाढली आहे.रानडुकरांची संख्या सुद्धा वाढली आहे.मोर आणि हरणांचा शेतीला त्रास सुरूच आहे.हे सर्व आम्ही सहन करीत आहोत.पण आता बिबट्या दारात आल्याने लोकांची चिंता वाढते आहे.वनविभागाने याकडे तातडीने लक्ष द्यायला हवे.लोकांच्या जीविताला धोका व्हायची वाट पाहू नये."
जीवन शिंदे (सरपंच पिंगोरी)