Type Here to Get Search Results !

आज पासून ७५ वर्षा पुढील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार एस.टी.ने मोफत प्रवास

 आज पासून ७५ वर्षा पुढील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार एस.टी.ने मोफत प्रवास 

   राज्य सरकारने लागू केली अमृत ज्येष्ठ नागरिक योजना

 नीरा दि.२६



    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी खुश खबर देण्यात आली आहे.. आता  ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकाराच्या एस टी बसेसमध्ये विनामुल्य प्रवास  करता येणार आहे. तर  ६५ ते ७५ वर्षापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकाराच्या एस टी.बस सेवेमध्ये ५० % सवलत असणार आहे.  याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, पुणे यांच्या वतीने प्रसिद्धीसाठी देण्यात आली आहे..


  राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमीत्ताने व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७५ व्या वर्षांत पदार्पण निमित्ताने दिनांक २६.०८.२०२२ पासून म्हाजेच आज पासून  ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांना सर्व प्रकाराच्या बसेसमध्ये विनामुल्य प्रवास सवलत व ६५ ते ७५ वर्षापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकाराच्या एस. टी. बस सेवेमध्ये ५० % सवलत देण्याचा निर्णय घेतलाय.  अमृत ज्येष्ठ नागरिक योजना या नावाने ही योजना सुरू करण्यात आलीय. ही सवलत  महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंतच असणार आहे. या सवलतीकरीता आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, केंद्र किंवा राज्य शासनाच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांना दिलेली ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन परवाना, तहसिलदार यांनी दिलेले ओळखपत्र व राज्यपरिवहन महामंडळाद्वारे देण्यात येणारे स्मार्टकार्ड, डीजी लॉकर, एम आधार ही ओळखपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत.मात्र त्यावर फोटो, जन्मतारीख, रहिवासी पत्ता अनिवार्य आहे.


दि.२६.०८.२०२२ च्या पुर्वी आगाऊ आरक्षण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही याचा लाभ घेता येणार आहे.परिपत्रक लागु होणा-या तारखेनंतर प्रवास सुरु केल्यास त्या ज्येष्ठ नागरिकांना त्याचा परतावा देण्यात येईल. याकरिता त्या ज्येष्ठ नागरिकांनी जवळच्या  आगारात, बसस्थानकावर परताव्याकरिता अर्ज व वयाच्या पुरव्याची प्रत सादर करावी  लागणार आहे. तरी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक, रमाकांत गायकवाड यांनी केलय.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies