Type Here to Get Search Results !

गावातील ज्ञानमंदिराकडे ग्रामस्थांनी लक्ष द्यायला हवे. भरत निगडे यांचे आवाहन...

 गावातील  ज्ञानमंदिराकडे  ग्रामस्थांनी लक्ष द्यायला हवे. भरत निगडे यांचे आवाहन...



  मराठा महा संघाचे जिल्हा अध्यक्ष सुभाष जेथे यांनी  वाढ दिवस केला विद्यार्थ्यांसोबत साजरा 


   पुरंदर दि.९


       गावसाठी जसे ग्रामदेवतेचे  मंदिर महत्त्वाचे आहे, तसेच गावातील ज्ञानं मंदिरही महत्वाचे आहे .गावातील प्रत्येकाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी केले आहे. नीरा येथे शिवतक्रारवाडी येथील प्राथमिक शाळेतील  कार्यक्रमात ते बोलत होते...

     शिवतक्रारवाडी येथील आपल्या सामाजिक कामाने समाजामध्ये चांगलं ठसा उमटवणारे   व सतत लोकांना उपयोगी पडणारे पुणे जिल्हा मराठा महासंघाचे उपाध्यक्ष सुभाष जेधे यांनी आपला वाढ दिवस कोणत्याही  डामडौला  शिवाय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत साजरा करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलय...  यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश भेट दिले.त्याच बरोबर शालेय साहित्य  व खाऊ दिला . या वेळी समर्थ पतसंस्थेचे राजेश चव्हाण, पुणे जिल्हा सोशल मीडिया परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे,  मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, ज्येष्ठ पत्रकार रामदास राऊत,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शिक्षक नंदकुमार चव्हाण , सहशिक्षक  हडंबर गुरुजीसह विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी भरत निगडे म्हणाले की,आपल्या आनंदात सर्वांना बरोबर घेऊन जाणे किंवा त्यांच्या बरोबर सुख वाटून घेणे हेच खरे जीवन आहे. प्रत्येकाने आपला वाढदिवसाचा खर्च टाळून  समाज उपयोगी कमे करायला हवीत. प्रत्येकाने दररोज गावातील मंदिरात देवदर्शन तर जरूर घ्यावे .पण त्याच बरोबर गावातील ज्ञान मंदिराकडे सुद्धा लक्ष द्यावे.कारण इथूनच आपली पुढील पिढी घडणार असते .त्याकडेच आपण लक्ष देत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली .यावेळी राहुल शिंदे,रामदास राऊत,राजेश चव्हाण यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies