संपूर्ण नीरा शहर सीसी टीव्हीच्या कक्षेत
पोलिसांनी काढलेल्या लोकवर्गणीतील कॅमेरे बसलेच नाहीत; त्या लाखो रुपयाचं काय?
नीरा दि.६
नीरा ग्रामपंचायतीच्यावतीने संपूर्ण नीरा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण नीरा शहर सीसीटीव्हीच्या नजरेत आले आहेत.त्यामुळे आता संपूर्ण नीरा शहरावर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे.नीरा ग्रामस्थांनी अनेक वर्षांची मागणी ग्रामपंचायतीच्यावतीने पूर्ण करण्यात आली आहे
नीरा परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नीरेतील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.त्याच बरोबर पोलिसांनीही सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना केल्या होत्या.त्यामूळे ग्रामपंचायतीच्यावतीने सर्व महत्त्वाच्या ठिकाणी उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती उपसरपंच राजेश काकडे यांनी दिली आहे.नीरा शहरातील छत्रपती शिवाजी चौक, बुवासाहेब चौक,आंबेडकर चौक,बाजारतळ त्याच बरोबर शिवतक्रारवाडी याठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत.यातील काही कॅमेरे ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालयाशी सलग्न करण्यात आले आहेत.तर काही कॅमेरे इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्यात आले आहेत. हे कॅमेरे उत्तम दर्जाचे असून रात्रीच्या वेळी सुद्धा हे चांगले काम करतात.तर यातून गाडीचा नंबरही झूम करून पाहता येतो अशी माहिती सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच राजेश काकडे यांनी दिली आहे.
ग्रामपंचायतने कॅमेरे बसवले मग पोलिसांनी गोळा केलेले लाखो रुपये गेले कुठे?
नीरा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पोलीस यंत्रणा आग्रही होती.गुन्हेगारीला आळा यातून बसेल असे पोलिसांनी म्हटले होते.काही वर्षा पूर्वी पोलिसांनी ग्रामस्थांकडून लाखो रुपये गोळा केले होते.एका ठेकेदाराला हे कॅमेरे बसवण्याचा ठेकाही देण्यात आला होता.मात्र चार पाच वर्षाचा कालावधी निघून गेला तरी आजूनही पोलिसांचे सीसीटीव्ही कॅमेरे बसलेच नाहीत.मग पोलिसांनी लाखो.रुपये गोळा केलेले गेले कुठे? असा सवाल लोक उपस्थित करू लागले आहेत.कायदा सूव्यवस्थेचा प्रश्न असल्याने लोकांनी मोठ्या विश्वासाने पोलिसांना पैसे दिले. मात्र या कायद्याच्या रक्षकानेच त्याचा काय उपयोग केला हे गुलदस्त्यात राहिले आहे. पोलिसांनी लोक वर्गणीच्या विनियोग योग्य प्रकारे न केल्याने लोकांचा पोलिसांवरील विश्वासाचं उडाला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक या बाबत लक्ष घालून जनतेचा पैसा गेला कुठे याबाबत चौकशी करतील का? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.लोकांचा दबाव वाढल्यावर पोलीस संबधित ठेकेदाराला पकडून आणतात व नंतर सोडून देतात. काम मात्र होत नाही.त्यामुळे या मागे मोठे गौड बंगाल असल्याची चर्चा नीरा शहरात आहे.मात्र यामुळे पोलिसांवरील विश्वास डळमळीत होत आहे.त्यामुळे याबाबत खात्यांतर्गत चौकशी होईल का?आणि जनतेचा पैसा कोणाच्या घशात गेला याचा छडा वरिष्ठ अधिकारी लावतील का?