रस्त्याच्या रुंदीकरणात हजारो झाडांची होणार कत्तल
वाल्हे दि.२७
आळंदी ते पंढरपूर या मार्गाच्या विस्तारीकरणात जेजुरी ते निरा दरम्यान हजारो झाडांची कत्तल होणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम नुकतच सुरू झाले आहे. यामध्ये जेजुरी वाल्हे दरम्यानच्या रुंदीकरणात रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडांची कत्तल सध्या सुरू आहे. या झाडांची कत्तल न करता त्याची दुसऱ्या ठिकाणी पुन्हा लागवड केली जावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी करत आहेत.
पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील जेजुरी ते नीरा यादरम्यानच्या अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करून वाहन चालकांना दिलासा मिळावा अपघात कमी व्हावे म्हणून अनेक दिवसापासून लोक मागणी करत आहेत. या रस्त्याचे काम सध्या सुरू झाले आहे. मात्र या रस्त्याच्याकडेला असलेली अनेक झाडे यामध्ये उध्वस्त होत आहेत. प्रशासनाने ही झाडे काढून टाकून देऊ नयेत तर या झाडांचं पुनर्वसन केलं जावं. अशी मागणी पर्यावरण प्रेमी करत आहेत. ही झाडे साधारण सरसकट काढून फेकून दिले जात आहेत. ती फेकून न देता या झाडांची योग्य ठिकाणी लागवड केल्यास निसर्गाचे होणार नुकसान कळेल टळेल.याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेऊन पर्यावरणाचा होणार नुकसान टाळावं असं पर्यावरण प्रेमी अमोल साबळे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, सरकारनेच ही झाडे लावली आहेत. त्याचे जतनही चांगल्या प्रकारे केले. पण आता लगेच ती काढून टाकली जात आहेत. त्या ऐवजी त्याचं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केलं तर ही झाडे वाचू शकतील.