गद्दारांबरोबर जायचे नाही पुरंदर मधील शिवसैनिकांच्या भावना
सासवड दि.८
महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत थेट सत्तातंर घडवून आणले.
या सत्तातंरात आपली भाकरी भाजून निघावी म्हणून पुरंदर-हवेलीचे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शिंदे गटाला पाठिंबा देत शिवसेनेशी बंडखोरी केल्याचे शिवसैनिकांचेच म्हणणे आहे.
दरम्यान, इतके दिवस अजित पवारांसह पवार कुटुंबावर आसुढ ओढणारे शिवतारे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती करण्याचा बेतात आहे. महाविकास आघाडी फोडणाऱ्या शिंदेगटाला पाठिंबा देणाऱ्या आणि माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठकारे यांचाशी फारकत घेणाऱ्या शिवतारेंशी स्थानिक पातळीवर जुळवून घेऊ नका, असे राष्ट्रवादीचा पदाधिकऱ्यांचे म्हणणे आहे.
शिवतारेंनी पवार कुटुंबीयांवर विशेषत: अजित पवारांवर अनेकदा टीका केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवतारे यांनी राष्ट्रवादीवर घणाघाती टीका करताना सुप्रिया सुळे यांनाच आव्हान दिले होते. तेव्हा संयम संपल्यांवर अजित पवारांनी शिवतारे कसे निवडून येणार, हे बघतोच असे म्हणत जाहीर सभेत शिवतारेंना आव्हान देत त्यांचे पानिपत केले होते.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. तेव्हाही शिवतारेंनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा हा सातत्याने वाचला होता. खासदार संजय राऊत यांच्यासमोर देखील त्यांनी पवार कशी मुस्कटदाबी करतात हे बोलून दाखवले होते. राऊत यांनी त्यावेळी त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता; मात्र शिवतारे यांचा सूर सध्या बदलला आहे. पवारांवर टीका करण्याची संधी न सोडणाऱ्या शिवतारे यांनी अचानक अजितदादांवर प्रेम दर्शविले आहे.
आपल्या व्हॉट्सऍपवर अभिनंदन असे स्टेटस ठेवले तर पवारांवर कोणीही टीका करू नये ते राज्याचे नेते आहे, याचे भान ठेवा असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्याने जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. दरम्यान, त्यांचे हे खरच प्रेम आहे की बेगडीप्रेम आहे, असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. आगामी काळामध्ये होणाऱ्या नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, यानंतर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती करण्याची तयारी असावी, अशी शक्यता राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केली जात आहे.
“रंग बदलू शिवतारे’
पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. महाविकास आघाडीचे सरकार असतानाही शिवतारे यांनी खासदार संजय राऊत यांच्यासमोरच अजित पवारांवर निशाणा साधला होता; परंतु आता शिवतारे यांनी अचानक आपली भूमिका बदलली. तसेच अजित पवार यांच्यावर टीका करू नका, असा सल्ला दिला असल्याने “रंग बदलू शिवतारे’ अशीही उपाधी सध्या शिवतारेंना जोडली जात आहे.