वीर धरणाच्या पणीसाठ्यात एका दिवसात मोठी वाढ
नीरा दि.१२
पुरंदर तालुक्यातील वीर धरणाच्या पणी साठ्यात काल सोमवारी दिवसभरात मोठी वाढ झाली आहे. काल दिवस भरात जवळ जवळ १ टीएमसी पाणी वीर धरणात आले असल्याची माहिती अभियंता विजय नलावडे यांनी दिली आहे.
काल दिनांक ११ जून रोजी सकाळी वीर धरणात ४.३९ टीएमसी म्हणजे ४६ टक्के पाणी साठा होता. काल दिवसभर आणि आज रात्री झालेल्या पावसामुळे वीर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले असून पाणीसाठ्यात एक टीएमसी ने वाढ झाली आहे.आज मंगळवारी सकाळी वीर धरणातील एकूण पाणीसाठा ५.३६ टीएमसी झाला आहे.वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याची माहिती शाखा अभियंता विजय नलावडे यांनी दिली आहे.असाच पाऊस सुरू राहिल्यास धरणात मोठ्या प्रमाणत पणी येणार आहे या पाण्याचा उपयोग धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतीसाठी होणार आहे.
त्यामूळे कालव्याच्या पाण्यावर शेती अवलंबून असणारा शेतकरी सुखावला आहे.