सुरक्षिततेची काळजी न घेता सुरु आहे नीरा येथील बुवासहेब ओढ्यावरिल पुलाचे बांधकाम.
नीरा दि.८
नीरा शहरातून बारामती अथवा मोरगाव बाजुला जाणाऱ्या रस्त्यावरील बुवासाहेब ओढ्यावर नव्याने सुरू असलेले पुलाचे बांधाकम सुरक्षिततेची काळजी न घेता सुरु आहे. बारामती अथवा मोरगाव बाजून येताना बुवासाहेब मंदिराजवळ नव्याने होत असलेल्या पुलाकडे असलेल्या खड्यात वाहनचालक जाऊ नये म्हणून कोणतीही काळजी घेतल्याचे दिसून येत नाही.
बारामती अथवा मोरगाव बाजूने येताना बुवासाहेब मंदिरासमोर येण्याआधी तीव्र उतार आहे. मंदिरा समोर आल्यावर नव्या पुलाच्या बंधकामामुळे पर्यायी तकलादू रस्ता केला आहे. पण नव्या पुलाच्या बांधकामासाठी घेतलेल्या खड्याकडे वाहने जाऊ नये म्हणून खबरदारी घेतली नाही. त्याठिकाणी रेडियमचे बँरिकेट लावणे अथवा मुरुम, दगडी आडवी ठेवणे किंवा अडथळा निर्माण करणे गरजेचे असताना अशी कोणतीही काळजी घेतलेली दिसत नाही.
फक्त एक डायवर्शन असा छोटा फलक तोही इंग्रजी भाषेत लावला आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील दुचाकीस्वाराला याचा अर्थ कितपत समजेल हा प्रश्नच आहे.
मागील आठवड्यात २ जुलै रोजी नीरा मोरगाव दरम्यान चौधरवाडी (ता.बारामती) येथील पुलाच्या खड्डयात एक दुचाकीस्वार कोसळाल व तो म्रुत्यू पावला. त्याच्या कुटुंबीयांनी आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वडगाव निंबाळकर पोलीसांत केली आहे. हा अनुभव घेता संबंधित ठेकेदाराने आता बुवासाहेब औढ्यावरील पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी तरी सुरक्षिततेची कळजी