Type Here to Get Search Results !

आषाढीवारी निमित्त इंदू इंग्लिश स्कूलच्यावतीने पालखी व दिंडी सोहळा

 आषाढीवारी निमित्त इंदू इंग्लिश स्कूलच्यावतीने पालखी व दिंडी सोहळा

  संतांच्या मेळ्याने दिला पर्यावरण वाचविण्याचा संदेश



जेजुरी  वार्ताहर  दि ८ 


    राज्याच्या विविध भागातून विशेषता आळंदीहून पंढरीकडे श्री पांडुरंगाच्या दर्शनसाठी संतांचे पालखी सोहळे मार्गस्थ झाले आहेत. दि १० रोजी आषाढी एकादशी असून या निमित्ताने इंदू इंग्लिश स्कूलच्या वतीने सलग दहाव्या वर्षी जेजुरी शहरातून पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संताच्या मेळ्याने आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे वेश परिधान करून पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला. 


       इंदू स्कूल कोळविहीरेच्या वतीने संस्थेच्या संस्थापिका श्रीमती इंदुमती कुटे,अध्यक्ष डॉ रामदास कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढीवारीच्या निमित्ताने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते, शुक्रवार दि ८ रोजी या सोहळ्याचे उद्घाटन जेजुरी उद्योजक संघाचे सचिन राजेश पाटील,देवसंस्थानचे माजी विश्वस्त नितीन राउत,जिल्हा कला शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोक साबळे, पुरंदर तालुका व्यसनमुक्त युवक विकास संघाचे अध्यक्ष आनंद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.


      जेजुरी नगरपालिका पटांगणातून पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.फुलांनी सजवलेली पालखी ,विठ्ठल रुकमाई,संत ज्ञानेश्वर,तुकाराम आदी संतांचा वेश परिधान करून डोक्यावर तुळस ,खांद्यावर वारकरी संप्रदायाची भगवी पताका ,मृदुंग,टाळ,वीणा यांच्या गजरात,ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करीत चिमुकल्या विद्यार्थांनी जेजुरी शहरातून पालखी सोहळ्याची मिरवणूक काढली.रस्त्यावर भाविकांनी फुले उधळून या सोहळ्याचे स्वागत केले. या सोहळ्यात पर्यावरण वाचवा या संदर्भातील फलक लावून जनजागृती करण्यात आली. विद्यालयाची विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरी भोसले हिचे प्रत्येक चौकात सुश्राव्य कीर्तन झाले. या सोहळ्याची सांगता राष्ट्रीय संत काशिनाथ महाराज यांच्या विठ्ठल मंदिरात झाली.


      इंदू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य पुरुषोत्तम रोटे,गणेश गोळे,मनोज सोनवणे,जितेंद्र थोपटे,नीलम चव्हाण,मोनिका घाडगे व आदी शिक्षकांनी या सोहळ्याचे नियोजन केले होते. संस्थेचे उपाध्यक्ष माणिक झेंडे पाटील यांनी सोहळ्याला शुभेछ्या दिल्या तर संस्थेच्या सचिन डॉ मोनिका कुटे यांनी सर्वांचे आभार मानले. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies