Type Here to Get Search Results !

शैक्षणिक ,सामाजिक पत्रकारिता व धार्मिकक्षेत्रात नितीन राउत यांचे योगदान; अंकुश माने सहाय्यक पोलीस निरीक्षक

 शैक्षणिक ,सामाजिक पत्रकारिता व धार्मिकक्षेत्रात नितीन राउत यांचे योगदान:  अंकुश माने  सहाय्यक पोलीस निरीक्षक 



जेजुरी    वार्ताहर दि २४  शैक्षणिक,सामाजिक,पत्रकारिता व धार्मिक क्षेत्रात नितीन राउत यांचे काम उल्लेखनीय आहे. शैक्षणिक क्षेत्रात गुणवंत विद्यार्थी व समाज घडविण्यासाठी त्यांचे योगदान आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून  सर्व सामान्यांना न्याय देवून सामाजिक,धार्मिक विषयांवर त्यांनी सतत लिखाण केले आहे. आणि संघटन कौशल्याच्या जोरावर सर्वच क्षेत्रात त्यांचे नावलौकिक आहे असे मनोगत सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी व्यक्त केले.

      जेजुरी उद्योजक संघ व केबीसी यांच्या वतीने सेवापुर्तीच्या निमित्ताने मुख्याध्यापक नितीन राउत यांच्या गौरव कार्यक्रमाचे आयोजन जेजुरी एमआयडीसीतील जिमाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ.रामदास कुटे, कार्याध्यक्ष रवींद्र जोशी,उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे,सचिव राजेश पाटील ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने,पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे, डॉ.मोनाली कुटे, डॉ.विश्वास नाझीरकर,उद्योजक राजेंद्र महामिने,मनेश सरमाने,जिमाच्या व्यवस्थापक जालिंदर कुंभार,जेजुरी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष एन डी जगताप,संतोष खोमणे, म्हाळसा मंडळाच्या प्रमुख विद्या म्हेत्रे,कला शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोक साबळे आदी उपस्थित होते.  यावेळी जिमा व केबीसीच्या वतीने सन्मानचिन्ह देवून नितीन राउत यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.

    


  जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ.रामदास कुटे या प्रसंगी बोलताना म्हणाले नितीन राउत यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम तर केलेच तसेच  पत्रकारितेच्या माध्यमातून जेजुरी एमआयडीसी मधील उद्योजक,कामगार ,येथील समस्यांना न्याय देण्याचे काम केले. श्री मार्तंड देवसंस्थान ट्रस्टवर विश्वस्त असताना ऐतिहासिक भेटीचे शिल्प,भक्तनिवास बांधण्यासाठी पुढाकर घेतला. सामाजिक क्षेत्रात सर्व सामान्यांना समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले.

      यावेळी आनंद नाईक.आशिष कदम,रवींद्र जोशी,पांडुरंग सोनवणे,पुंडलिक गावडे, एन डी जगताप,डॉ मोनाली कुटे, विद्या म्हेत्रे यांची भाषणे झाली.

    सूत्रसंचालन उद्योजक रवींद्र जोशी तर आभार अशोक साबळे यांनी मानले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies