गुळूंचे येथील आरोग्य तपासणी शिबिरात दोनशे लोकांची करण्यात आली आरोग्य तपासणी
नीरा दि.६
गुळूंचे (ता. पुरंदर ) येथे आज j दि.६) रोजी गुळूंचे ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र नीरा यांच्यावतीने गुळूंचे येथील ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २०० ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती गुळूंचे गावचे सरपंच संतोष निगडे यांनी दिली आहे.
गुळूंचे ग्रामपंचायतीच्यावतीने दर वर्षी ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाते.यावर्षी सुद्धा अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी आरोग्य शिबिराला सहकार्य केले.त्याच बरोबर काही खाजगी डॉक्टरांनी सुद्धा यावेळी आपली मोफत सेवा दिली. यामध्ये डॉ. ममता पळसे, डॉ.सचिन ननावरे,डॉ. महेश गोरगल, डॉ.गणेश म्हस्के, बुधरानी हॉस्पिटलचे मंशुर शेख इत्यादींनी आपली मोफत सेवा दिली तर नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश बागुल, डॉ. समीक्षा कांबळे, आरोग्य सहाय्यक बाळासाहेब भंडलकार, सत्यभामा म्हेत्रे
बेबी तांबे, अनिता नेवसे, सुनीता गोवेकर,मंदाकिनी खताळ आरोग्य सेवक फिरोज मुलाणी, सूर्यकांत नेवसे, लॅब टेक्निशियन मनीषा जाधव व सर्व आशा सेविका यांनी या आरोग्य शिबिरात आपली सेवा दिली
यावेळी सरपंच संतोष निगडे, उपसरपंच संतोष भगवान निगडे, माजी सभापती अजित निगडे,नारायण भाऊ निगडे,संचालक जितेंद्र निगडे,निलेश निगडे,दीपक निगडे,अतुल निगडे सोसायटी चेअरमन राजेंद्र निगडे, गोरख गायकवाड,संभाजी कुंभार, ग्रामसेवक जयेंद्र सूळ, संजय निगडे, सुनील कोंडे इत्यादी मान्यवरांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
आज झालेल्या शिबिर मध्ये २०० लोकांची.आरोग्य तपासणी करण्यात आली.यामध्ये मधुमेहाचे पाच नवीन रुग्ण आढळून आले तर उच्च रक्त दाबाचे १० नवे रुग्ण आढळून आले.यावेळी ९० लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली.ज्या लोकांना चश्मा लागला आहे अशा लोकांना ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत चश्मा देण्यात आला.