गुरूंची जाणीव मनात ठेवून गुरु विषयी आदर व्यक्त करावा : प्रा. निवेदिता पासलकर.
सौ.लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्या मंदिर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
नीरा :
"गुरुचे स्थान आयुष्यात आहेच, आपण आपल्या आयुष्यात इतरांचेही चांगले गुरु व्हावे. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर योग्य गुरुची साथ असेल तर आयुष्य यशस्वी होते. गुरुचे आयुष्यातील स्थान पुरातन काळापासून वंदनीय मानले गेले आहे. गुरूंची जाणीव मनात ठेवून गुरु विषयी आदर व्यक्त करावा." असे मार्गदर्शन प्राचार्य निवेदिता पासलकर यांनी केले.
नीरा येथील सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयात बुधवार (दि.१३) रोजी उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी झाली. यावेळी प्रा. पासलकर बोतल होत्या. पर्यवेक्षक उत्तम लोहकरे आणि सर्व सेवकांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. इयत्ता पाचवी ते दहावी अखेरील विद्यार्थिनींनी सुंदर शुभेच्छापत्र तयार केली व शाळेतील शिक्षकांना देण्यात आली. विद्यार्थिनींनी गुरुचे महत्व दर्शवण्यासाठी सुंदर भाषणे केली. इयत्ता दहावी मधील राणी मोरे, सृष्टी शेंडगे, यशस्वी जाधव या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाची तयारी केली. यावेळी विद्यालयातील सहशिक्षक शितल शिंदे, रूपाली रणनवरे, संजय भोसले, सपना ओव्हाळ, अश्विनी खोपे, ज्ञानेश्वर जाधव व सर्व सेवक वर्ग उपस्थित होते. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करून गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.