शिवसेनेचा एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा ; कॉंग्रेस नाराज
शिवसेना पक्षात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. पक्षात अजूनही गळती सुरुच असून शिंदे गटाकडे इनकमिंग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने काल एनडीएचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा जाहीर केला आहे.दरम्यान, मुर्मू यांना पाठींबा दिल्याने काँग्रेस नाराज झाली आहे.
आत्ता महाराष्ट्रात चाललेलं राजकारण पाहता मी पाठिंब्यासाठी विरोध करायला हवा होता. पण राष्ट्रपतीपदाच्या निवडीसंदर्भात शिवसेनेने नेहमीच वेगळी भूमिका घेतली आहे. आताही शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, असा सांगत मी कोत्या मनाचा नाही. आदिवासी समाजाच्या अनेक नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचे फोन आल्या नंतर प्रेमाच्या आग्रहाखातर आम्ही मूर्मू यांना पाठिबा देण्याचा निर्णय घेतल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बांधावे शरद पवार यांची प्रतिक्रिया
लोकशाहीमध्ये तुम्ही आणि मी यापेक्षा सामान्य लोक अधिक हुशार असतात.
आपल्याकडे बघणारे हजारो लोक असतात. ते लोक बोलत नाहीत. पण मतदानाची संधी
मिळाल्यावर ते निर्णय घेतात.
1977 साली ज्यांना राज्य मिळालं, त्यांना ते चालवता आलं नाही. मग
पुन्हा लोकांनी इंदिरा गांधींच्या हातात सत्ता दिली, असे आज राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.