यावेळी शेतकरी बेंदराचा सन करणार उत्साहात साजरा.
कोरोनामुळे दोन वर्षानंतर शेतकरी साजरा करणार बेंदुर
नीरा दि.११
गेली दोन वर्ष बळीराजाला आपल्या सर्जा राजाचा सन असलेला बेंडुर मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नव्हता. कोणतीही मिरवणूक काढता आली नव्हती की सर्जा राजाला देवाचे दर्शनाला नेहता आले नव्हते. मात्र या वेळेस कोणताही
अडथळा नसल्याने आता उद्या होणारा बेंदूर सर शेतकरी मोठा उत्साहात साजरा करणार आहे.
पुरंदर तालुक्यातील दक्षिण पट्ट्यात नीरा नदी काठच्या वीर, पारिंचे,कांबळवाडी, जेऊर मांडाकी, पिंपरे , गुळूंचे या गावामधून बेंदुर सन साजरा केला जातो.उद्या ( दि.१२) रोजी हा सन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे पाऊस असूनही बेंदराच्या सणाच्या खरेदीसाठी शेतकरी दुकानात आल्याचे पाहायला मिळाले .कोरोणाचे निर्बंध नाहीत आणि बैल गाडा शर्यातही सुरू झाली आहे. त्यामुळे बैल गाडाशौकीन आणि शेतकरी दोघेही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करणार आहेत.नीरा बाजारपेठेत आज बेंदूर सणाच्या आदल्या दिवशी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. बैलांच्या सजावटीच्या साहित्याच्या किमती मध्ये यावर्षी २५ ते ३०टक्के ची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा महागाईचा सामना करावा लागतो आहे.
"गेली दोन वर्ष कोरोनामुळे बेंदूर सण उत्साहात साजरा करता आला नव्हता. मात्र यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने शेतकऱ्याने आपल्या बैलांच्या सजावटीसाठी चांगली खरेदी केली आहे. त्यातच बैलांच्या शर्यतीवरील असलेली बंदी उठल्याने बैलगाडा शौकीन सुद्धा आनंदी आहेत त्यामुळे सजावटीच्या साईट त्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली"
(सचिन शिंदे व्यापारी)