राष्ट्रवादीने पाच मते ठेवली राखून
मुंबई दि.२०
राष्ट्रवादीने काँगेस पक्षाने आपल्या पाच महत्वाच्या नेत्यांची मते मागे ठेवली आहेत.त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतील उत्सुकता आता वाढली आहे.त्यातच असताना एक भाजपा एक नेता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेला आहे.
भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. यातच आमदार रवी राणा विधान भवनात पोहोचले आहेत. यामुळे बावनकुळे हे नेमके कशासाठी अजित पवारांना भेटण्यासाठी गेलेत हे समजू शकलेले नाही. दरम्यान, अजित पवार, एकनाथ खडसे आणि बावनकुळेंमध्ये चर्चा सुरु असल्याचे समजते.
शिवसेनेच्या आमदारांची बस यायला उशीर झाला होता. वाहतूक कोंडीत ही बस अडकली होती. यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी भाजपा, राष्ट्रवादीनंतर मतदान करण्यास सुरुवात केली. श उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारांना कोणाला, कसे मतदान केले याचे मार्गदर्शन केले. परंतू दोन आमदार विधान भवनात आलेच नव्हते. आणखी दोन आजी-माजी मंत्री तुरुंगात असल्याने ही दोन मते देखील राष्ट्रवादीला मिळणार नाहीएत.
या निवडणुकीत आतापर्यंत २०३ आमदारांनी मतदान केले आहे. भाजपाने १०५ हून अधिक आमदारांचे मतदान झाले आहे. तर राष्ट्रवादीने देखील आपल्या आमदारांचे मतदान पार पाडले आहे. परंतू, पाच महत्वाचे नेते मागे राहिल्याने ही नेमकी खेळी कशासाठी याबाबत लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.