पुणे पंढरपूर मार्गावर पिंपरे येथे एसटी बस व दुचाकीच्या अपघातात दोन जण ठार
नीरा दि.९
नीरा (ता. पुरंदर )नजीक पिंपरी येथे एस टी बस आणि दुचाकीच्या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. आज दिनांक 9 जून रोजी रात्री 10 वांजलेच्या सुमारास पिंपरे येथे पुणे पंढरपूर मार्गावर मोटार सायकल आणि एस ती बस यांच्यात जोर दार टक्कर झाली यामध्ये सुकलवाडी येथील विजय काळे व वाल्हे नजीक माळवाडी येथील नाना भुजबळ यांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड ते गाणगापूर ही बस क्रमांक एम एच १४ बी टी ३४६६ गाणगापूरकडे निघाली होती. सुकलवाडीवाडी व माळवाडी येथे राहणारे दोघेजण मोटासायकल क्रमांक एम एच १२ एच एच या मोटार सायकलवरून सुकलवाडीकडे निघाले होते. पिंपरे येथील जया हॉटेल समोर आले असता एस टी आणि मोटारसायकल यांच्यात धडक झाली. यामध्ये मोटार सायकलवरील दोन जण जागीच ठार झाले. घटने नंतर पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून दोघा मयातांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.