जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वाल्हे करण्यात आले श्रमदान
वाल्हे दि.५
आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जागृती फाऊंडेशन सुकलवाडी च्या वतीने भव्य श्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व जल मित्रांचे ग्रामस्थांकडून पारंपारिक पद्धतीने ढोल लेझीम च्या तालावर ठेका धरून गावातून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. यामध्ये पुणे येथील Barclays कंपनीतील २०० हून अधिक जलमित्रांनी श्रमदान केले.
या श्रमदाना मध्ये लहान चिमुकल्या पासून ते ज्येष्ठ लोकांनी देखील सहभाग नोंदवला. या श्रमदाना मध्ये सलग समतोल चर खोदण्यात आले व माती नाला बांध दुरुस्ती करण्यात आले. त्याचबरोबर पाणी फाउंडेशन 2018 साली केलेल्या कामांची दुरुस्ती करण्यात आली.
यावेळी सुकलवाडी येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व जल मित्रांना गावाकडील घरगुती पद्धतीचे झुंणका भाकर, शेंगदाणा चटणी, गावरान काळ्या घेवड्याची आमटी, लोणचे अशा प्रकारचे जेवण देण्यात आले.