ग्रामस्थांनी स्वच्छता मोहिमेला सहकार्य करावे : तेजश्री काकडे
नीरेत नवीन घंटागाडीचे लोकार्पण
नीरा: दि.१४
नीरा (ता.पुरंदर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आणखी एका नव्याने घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी काकडे बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे, उपसरपंच राजेश काकडे, सदस्य अभिषेक भालेराव, अनंता शिंदे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नीरा ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्री काकडे सदस्या राधा माने, सारिका काकडे, माधुरी वाडेकर यांच्या हस्ते या घंटागडीचे पूजन करण्यात आले. माजी उपसरपंच विजय शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडून ही गाडी ग्रामपंचायतीचा स्वच्छ्ता विभागाच्या ताब्यात देण्यात आली.
यावेळी उपसरपंच राजेश काकडे म्हणाले की,१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ही घंटागाडी घेण्यात आली आहे. ग्रामपंचायतीकडे असलेल्या काही घंटागाड्या अद्याप नादुरुस्त आहेत. त्याही दुरुस्त करून सेवेत आणल्या जाणार आहेत. त्यामुळे चार घंटागाड्या आणि एक ट्रॅक्टर ग्रामपंचायतीकडे असणार आहे. पुढील काळात वेळापत्रक ठरवून नीरेतील सर्व वार्ड मधून या घंटागाड्या मार्फत कचरा गोळा केला जाईल.
मागील काळात स्वच्छते संदर्भात ग्रामपंचायतीने केलेल्या उपयोजना लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. स्वच्छ नीरा सुंदर नीरा हे आमचे ब्रीद आहे. तशी स्वच्छता ठेवण्याचा आमचा सततचा प्रयत्न आहे. ग्रामस्थांनी या स्वच्छता मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच तेजश्री काकडे यांनी केले.
फोटोओळ : नीरा ग्रामपंचायतीच्या नव्या घंटागाडीचे पुजन करताना सरपंच तेजश्री काकडे व ग्रामपंचायत सदस्या.