पुरंदर मध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही पुरंदर भाजपचा सासवड येथील पत्रकार परिषदेत आरोप
भाजपचे वराती मागून घोड....!
अन्याय ग्रास्तांनी भाजपशी
संपर्क साधावा पुरंदर भाजपचे आवाहन
सासवड दि. ५
पुरंदर तालुक्यात गेल्या वर्ष भरापासून तालुक्यात अनेकांवर अन्याय होत आहे. सर्व
सामान्य लोकांचे म्हणणे प्रशासन यंत्रणा एकूणच घेत नाही.त्यामुळे अन्याय झालेल्या
लोकांनी पुरंदर भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुरंदर भाजपच्या
वतीने करण्यात आले आहे. या संदर्भातील एक पत्रकार परिषद पुरंदर भाजपच्यावतिने काल दिनांक ४ जून रोजी सायंकाळी सासवड येथे आयोजित
करण्यात आली होती.तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे,सासवड शहर अध्यक्ष साकेत जगताप
यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली .
पुरंदर तालुक्यातील
पोलीस यांत्रेवर सत्तधारी पक्षाच्या लोकांचा प्रचंड दबाव आहे आणि त्यातून
सर्वसामान्यांच्या तक्रारी पोलीस एकूण घेत नाहीत. ज्या लोकांवर अन्याय झाला आहे त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभ
केला जात आहे . त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी सामन्यांच्या पाठीमागे उभी राहणार
आहे. कॉंग्रेसचा एक कार्यकर्ता सतत तालुक्यातील पोलीस स्टेशनाच्या कारभारात ढवळा ढवळ करीत आहे.यामुळे सर्वसामान्य
लोकांच्या मुलीबाळी आता सुरक्षित राहिल्या नाहीत. परवाच सासवड मध्ये पोस्कोचा
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासवड मध्ये असलेल्या महा विध्यालायातील तरुणी आता
सुरक्षित नाहीत. त्यासाठी पोलिसानी दामिनी पथक कार्यान्वित करावे अशी मागणी भाजपच्यावतीने
करण्यात आली आहे. या सर्वांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही जिल्हा पोलीस
अधीक्षकांकडे मागणी करणार आहोत असे भाजपच्यावतीने सांगण्यात आले आहे.
भाजपचे वराती मागून घोड....!
दरम्यान भाजपच्या या
पत्रकार परिषदे बद्दल सर्व सामान्य लोकांनी वराती मागून घोड अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे .
पुरंदर तालुक्यात सध्या प्रबळ विरोधो पक्ष नेता नाही. त्याच बरोबर विरोधी पक्ष देखील नाही. शिवसेना,
राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सध्या सत्ताधारी पक्ष आहेत. ते एकामेकांच्या गळ्यात गळा
घालूनच चालत आहेत. त्यामुळे तालुक्यात विरोधकांची मोठो पोकळी निर्माण झाली आहे.
मात्र तरी देखील भाजपला याचा फायदा घेता
आला नाही .लोकांवर अन्याय होत असताना भाजपने बघ्याची भूमिका घेतली. मात्र शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी आवाज उठवल्या
नंतर भाजप चार दिवसा नंतर पत्रकार परिषद घेऊन जनतेचा कळवला असल्याचे भासवते आहे.
वास्तविक गेली वर्षभर जनता अन्यायाने त्रस्त
असताना तुम्ही काय वरून आदेश येण्याची वाट पाहत होता का ? असा सवाल पुरंदरची जनता
करीत आहे.