सासवड येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणातील शवविच्छेदन अहवालाचा तज्ञांकडून आढावा घेणार ; जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांची माहिती.
सासवड दि.३
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी तज्ञांचा सल्ला घेणार असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आभिनव देशमुख आणि म्हटलय. आज दिनांक 3 मे रोजी त्यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणात त्या मृत दोन व्यक्तींना मारहाण दल्याचे तपासात उघड झाल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही त्यांनीं म्हटले आहे
सासवड येथे दिनांक 24 मे रोजी एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याचा शवविच्छेदनअहवालात त्याचा मृत्यू उपासमारीने झाल्याचे म्हटले होते.त्यानंतर यातील दुसरा व्यक्ती ससून येथे मृत्यू झाला होता. त्याचाही अहवाल
प्राप्त झाला असून यामध्ये त्याच्या दोन्ही फुफुसला निमोनिया झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे.
या हत्याकांड प्रकरणी तालुक्यातील राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. त्यामूळे आता या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष घातले असून याबाबत सखोल चौकशी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.तर या दोन्ही शवविच्छेदन अहवाला बाबत तज्ञांकडून मार्गदर्शन घेतले जाईल असे त्यांनी म्हटले आहे.