Type Here to Get Search Results !

पालखी मार्गातील बहुतांश कामे १० तारखे पर्यंत पूर्ण होतील. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची माहिती

 पालखी मार्गातील बहुतांश कामे १० तारखे पर्यंत पूर्ण होतील. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची माहिती



सासवडच्या पुलाच कामही युद्ध पातळीवर पूर्ण करणार 

 

  नीरा दि. ८ 

       

     संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील आपेक्षीत अशी सर्व कामे १० तारखे पूर्वीच पूर्ण होतील असा विश्वास जिल्हाअधिकारी राजेश देशमुख यांनी व्यक्त केला आहे.त्याच बरोबर सासवड येथील कऱ्हा नदीवरील पुल देखील पालखी पूर्वीच पूर्ण होईल आणि या पुलाचा उपयोग वारकरी यावर्षी करतील असा विश्वास त्यांनी नीरा येथे पत्रकारांसी बोलताना व्यक्त केला आहे.

 


     पुणे जिल्ह्यातील हडपसर ते नीरा दरम्यानच्या पालखी मार्ग, विसावा व मुक्कामाच्या ठिकाणाची पाहणी आज पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केली. तालुक्यातील सासवड, जेजुरी, वाल्हे, पिंपरे खुर्द व नीरा येथील पालखी तळाची व तालुक्यातील पालखी मार्गातील कामांची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली.यानंतर पिंपरे येथील शासकीय विश्रमगृहात ते थांबले असताना पालखी मार्गातील अडथळ्या बाबत व अपुऱ्या कामाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तरे दिली व अपूर्ण कामे लवकरच पूर्ण होतील असे त्यांनी म्हटले आहे.



       यावेळी त्यांचे बरोबर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पालखी सोहळा प्रमुख अँड. विकास ढगे, जिल्हा परिषदेचे पणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे , नॅशनल हायवेचे अनिल गोरड , अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, तहसीलदार रुपाली सरनोबत,  जेजुरी पोलीस निरीक्षक उमेश तावसकर, मंडल अधिकारी संदीप चव्हाण, गोपाळ लाखे, विविध गावाचे तलाठी नीरेचे उपसरपंच राजेश काकडे,सदस्य अनिल चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब खतापे,पिंपरेचे सरपंच उत्तमराव थोपटे, आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी देशमुख म्हणाले की, सासवड येथील पुलाचे कामाला थोडा वेळ लागू शकतो.याठिकाणी थोडे भू संपादन बाकी आहे.मात्र या पुलावर स्लॅब टाकण्याचे काम 14 तारखे पूर्वी होईल.मात्र 20 तारखे पर्यंत हा पूल वापरात येऊ शकतो.वाल्हे येथील रेल्वेच्या कामाबद्दल रल्वे च्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे.तेही काम मार्गी लागणार आहे.एकंदरीतच पालखी सोहळ्यात कोणत्याही अडचणी येऊ नये म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहे.



     "आज जिल्हाधिकारी यांनी पालखी मार्गाची पाहणी केली त्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या आम्ही दाखवल्या आहेत.जिल्हाधिकारी यांनी सबंधित विभागाला त्या पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.प्रामुख्याने सासवडच्या पुल वल्हा पालखी टळला शेजारी सुरू असलेलं रेल्वेच काम आणि पिसुर्टी येथील अरूंद रस्ता याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांच्याशी बोललो आहे त्यांनी त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.त्या पूर्ण झाल्यावर आम्ही पुन्हा एकदा पाहणी करणार आहोत "

 विकास ढगे ( पालखी सोहळा प्रमुख)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies