Type Here to Get Search Results !

शिवसेनेने सर्व आमदार बोलावले मुंबई मध्ये

 शिवसेनेने सर्व आमदार बोलावले मुंबई मध्ये 

मते फुटू नयेत म्हणून खबरदार



 मुंबई: दि.६

राज्यसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या

मुळे मुंबईतील घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपचे धनंजय महाडिक विजयी होणार, असा छातीठोक दावा भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून केला जात आहे. धनंजय महाडिक यांना जिंकवण्यासाठी आमदारांच्या मतांची जुळवाजुळवी झाल्याचेही आशिष शेलार यांनी म्हटले होते. त्यामुळे आता शिवसेनेकडून आपले आमदार फुटू नयेत,यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईत दाखल व्हा, असा आदेश दिल्याची माहिती आहे.


शिवसेना आमदार मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येईल. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एका आमदाराचेही मत फुटणे, ठाकरे सरकारला परवडण्यासारखे नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये एकत्रच ठेवले जाईल. जेणेकरून भाजपकडून कोणत्याही आमदाराला फूस लावणे शक्य होणार नाही.



तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपक्ष आमदारांचे मन वळवण्यासाठी स्वत: मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी सहा वाजता अपक्ष आमदारांची भेट घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या संजय पवार यांना मत देण्यासाठी अपक्ष आमदारांना कशाप्रकारे राजी करणार, हे पाहावे लागेल.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies