महाविकास आघाडी सरकार जाणार हे निश्चित
एकनाथ शिंदे गट काढणार सरकारचा पाठिंबा
मुंबई . दि.२३
राज्यातील शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आता आघाडीचं सरकार जाणार हे आता निश्चित झाले आहे. लवकरच शिवसेनेचे गटनेते आणि वेगळा गट स्थापन करणारे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच पत्र राज्यपालांना देतील अशी माहिती समोर येतेय. त्यामुळे आघाडी सरकार आल्पमतात येणार आहे.
एकनाथ शिंदे गटाकडे यापूर्वी 30 पेक्षा जास्त आमदार आले होते. त्यात आता आणखी तीन आमदारांची भर पडली आहे. त्यामुळे वेगळा गट स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या 36 आमदारांची संख्या एकनाथ शिंदे गटाकडे झाली आहे. एकनाथ शिंदे आज कोणत्याही क्षणी राज्यपालांकडे उद्धव ठाकरे सरकार यांचा पाठिंबा काढल्याचे पत्र देणार असल्याची माहिती समोर येते आहे. यानंतर उद्धव ठाकरे सरकारला आपले संख्याबळ सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे लवकरच उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे राज्यातील आघाडी सरकार लवकरच जाणार हे आता स्पष्ट होत आहे. गुहाटी येथील आमदार असलेल्या रेडीसन हॉटेल बाहेर मोठा बंदोबस्त पाहायला.मिळतो आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे या पूर्वी 33 ते 34 आमदार होते यानंतर आता आणखी तीन आमदार या गटाला मिळाल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ हे फुटीर गटाकडे वाढले आहे. गुहाटी येथून आता घडामोडी वाढलेल्या आहेत .या ठिकाणी जास्तीचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आघाडी सरकार आता जाणार हे निश्चित झाले आहे