जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वाल्हे येथे वनविभागाच्या वतीने वृक्षारोपण.
वाल्हे दि. ५
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनविभागाच्या वतीने , वाल्हे (ता. पुरंदर) येथील भवानीमाता निसर्ग पर्यटन डोंगर परिसरामध्ये रविवारी ( दि. ५) वनविभागाच्या वतीने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते करण्यात आली.
याप्रसंगी, वनपाल राहुल रासकर, वाल्हे पोलिस दुरक्षेत्राचे हवालदार संतोष मदने, किशोर कुदळे, दिपक कुमठेकर, त्रिंबक भुजबळ, विशाल भुजबळ, वनमजूर महादेव माने आदि उपस्थित होते.
या वेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जैवविविधता जपण्यासाठी जेजुरी, साकुर्डे, पिंपरे,
वाल्हे आदि परिसरामध्ये विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आल्याचे, तसेच पावसाळ्यात वाल्हे परिसरासह डोंगर भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून, त्यांचे संवर्धन करण्यात येणार असल्याचे,
वनरक्षक पोपटराव कोळी यांनी सांगितले.