पिंगोरी येथे राबवण्यात आली पर्यावरण स्वच्छ्ता मोहीम.
वाल्हे दि.५
पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील कावडेवाडी आणि शिंदे नगर या भागात आज पिंगोरी ग्रामस्थ आणि इला फाऊंडेशन
यांच्यावतीने पर्यावरण स्वच्छ्ता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये गावातील पाणलोटक्षेत्र ओढे नाले व रस्त्याच्याकडेला पडलेला प्लॅस्टिक कचरा गोळा करून तो नष्ट करण्यात आला.
आज दिनांक ५ मे रोजी जागतिक पर्यावरण दिना निमित्त इला फाऊंडेशन व पिंगोरी येथील ग्रामस्थ यांच्यावतीने स्वच्छता मोहीम करण्यात आली. कवडेवाडी पासून ते शिंदेनगर ओढ्या पर्यत संपुर्ण प्लास्टिक गोळा करण्यात आला व नष्ट करण्यात आला. यावेळी पिंगोरीचे सरपंच जीवन शिंदे ग्रामपंचायत सदस्य संदिप यादव,भाग्यश्री शिंदे, सचिन शिंदे, राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस निलेश शिंदे, कुमार पवार, राहुल लोणकर, शामराव गायकवाड, पोपट खोमणे, मयुर गायकवाड, माऊली खोमणे, इला फाऊंडेशनचे डॉ.सतीश पांडे, डॉ. सुरूची पांडे,प्रविण यादव व अनेक तरूण उपस्थित होते यावेळी कुमार पवार व डॉ. सुरूची पांडे यांनी पर्यावरण स्वच्छते बद्दल माहिती दिली व सरपंच जीवन शिंदे यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या लोकांचे आभार मानले.