Type Here to Get Search Results !

सरपंचांनो सावधान ! गावात बालविवाह झाल्यास पद गेलेच म्हणून समजा,

 सरपंचांनो सावधान ! गावात बालविवाह झाल्यास पद गेलेच म्हणून समजा, राज्य सरकारने घेतलाय निर्णय 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची माहिती




पुणे:

       बालविवाह प्रतिबंध कायद्याची व्याप्ती वाढवत आता दोन कुटुंबापुरता त्याचा आवाका न ठेवता या कायद्याचा परीघ वाढविण्यात आला आहे. आता आपल्या गावात बालविवाह झाल्यास व त्याची नोंद घेतल्यास गावकारभारी म्हणजेच सरपंचांन दोषी धरत त्यांचे पद जाऊ शक्ते. याबाबतचा निर्णय घेतल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांंनी दिली आहे.


आता गावात बालविवाह झाल्यास त्याचा फटका सरळ गावकीचे पुढारपण करणाऱ्यांना बसणार आहे. राज्य सरकारने या कायद्याची कठोर अंमलबजावणीचे संकेतच दिले असूून त्याविषयी  च् गंभीरतेचा इशारा दिला आहे. गावात बालविवाह झाल्यास आता सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि नोंदणी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. एवढयावरच न थांबता राज्य सरकारने त्यांचे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याविषयीची माहिती दिली आहे. नुकतीच मुंबई उच्च न्यायलयाने वाढत्या बालविवाहविषयी चिंता व्यक्त करत राज्य शासनाचे कान टोचले होते. बालविवाह रोखण्यात पुढारी स्वारस्य दाखवत नसल्याने शासन अॅक्शन मोड मध्ये आलेले आहे. त्यामुळे कायद्याचा धाक दाखवत बालविवाह रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


कुटुंबीयांसोबतच गाव पुढारी ठरणार दोषी


बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार, बालविवाह झाल्यास नववधू-वराचे आई-वडिल, मंगल कार्यालयाचे मालक, पुरोहित आणि छायाचित्रकार यांच्यावर गुन्हा दाखल होतो. आता कायद्याची व्याप्ती वाढवत यामध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि नोंदणी अधिकाऱ्यांचा ही समावेश करण्यात आला आहे. बालविवाह कायद्यान्वये कुटुंबासोबतच गाव पुढारी रडारवर आले आहेत. त्यांच्यावर गुन्हाच दाखल होणार असून त्यांना पदावरुन ही पायउतार व्हावे लागणार आहे.


सामाजिक संस्थांची पाठ थोपटली


जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ‘बेटी बाचाव बेटी पढाओ’ योजनेतंर्गत बाल लिंग गुणोत्तर कमी असलेल्या गावातील पदाधिकाऱ्यांसाठी पुणे येथे कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. त्यात चाकणकर यांनी सामाजिक संस्थांची पाठ थोपटली. सामाजिक संस्थांनी बालविवाह रोखण्यात सिंहाचा वाटा उचलल्याचे कौतूक त्यांनी केले. पोलीस पाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सरपंच यांच्यापेक्षा त्यांनी केलेली कामगिरी सरस असल्याचा दावा त्यांनी केला.


यापूर्वी कसे वाढले विवाहाचे वय


बालविवाह प्रतिबंधक कायदा सर्वप्रथम १९२९मध्ये अस्तित्वात आला. या कायद्यान्वये मुलीचे वय १४ आणि मुलाचे वय १८ वर्षे ठरवण्यात आले. त्यानंतर १९५५ मध्ये हिंदु विवाह कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे वय १५ वर्षे तर मुलाचे वय १८ वर्षे करण्यात आले. बालविवाह कायद्यात १९७८ मध्ये सुधारणा करण्यात आली. यामध्ये मुलाचे लग्नाचे वय २१ वर्षे आणि मुलीचे लग्नाचे किमान वय १८ वर्षे करण्यात आले. त्यानंतर पुरुष आणि महिलांच्या विवाहयोग्य वयात समानता आणण्याच्या म्हणजेच महिलांसाठी विवाहाचे कायदेशीर वय १८ वरुन २१ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रिय मंत्रिमंडळाने १५ डिसेंबर २०२१ रोजी मंजूरी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies