सोशल मिडीयाची कार्यशाळा व एस.एम. देशमूखांना जिवनगौरव पुरस्कार.
पिंपरी- चिंचवड शहर पत्रकार संघाने भव्यदिव्य कर्यक्रमाचे केले आयोजन.
पुणे : दि.२०
मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ व पुणे जिल्हा सोशल मिडिया परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल मिडीयाची कार्यशाळा व परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस.एम.देशमुख यांना जिवनगौरव पुरस्कार सोहळा होणार आहे. पिंपरी- चिंचवड शहर पत्रकार संघाने हा भव्यदिव्य कर्यक्रमाचे आयोजीत केला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक रविवार दि. १९ रोजी झुम अँप द्वारे झाल्याची माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील सोशल मिडीया मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची कार्यशाळा व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस.एम.देशमुख यांना जिवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. हा भव्यदिव्य सोहळा पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाने शनिवार दि. २५ जून रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमा बाबत झुम मिटिंग रविवारी सायंकाळी ५ वाजता यशस्वी पद्वतीने झाली. या बैठकील बहुसंख्येने मराठी पत्रकार परिषदेचे, पुणे जिल्हा संघाचे, सोशल मिडिया परिषदेचे सदस्य हजर होते. प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे आपले मत मांडत कार्यक्रम भव्य दिव्य करण्याचे तसेच आपल्या तालुक्यातील व परिसरातली जस्तीत जास्त पत्रकार बांधव या कार्यशाळेसाठी आणण्याची ग्वाही दिली.
या बैठकीला मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्थ एस.एम.देशमुख, कर्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा समन्वयक सुनिल जगताप, परिषद प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार एम.जी. शेलार, सुनील वाळूंज, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, सोशल मिडिया परिषदचे जिल्हा प्रमुख जनार्दन दांडगे, उपाध्यक्ष राहुल शिंदे, पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडगूले, सचिन कांकरिया, संतोष वळसे पाटील, दादाराव आढाव, राजेंद्रबापू काळभोर, जयेश शहा, दौंड तालुका अध्यक्ष रविंद्र खोरकर, वेल्हा तालुका अध्यक्ष राजेंद्र रणखांबे, बारामती तालुका अध्यक्ष हेमंत गडकरी, पुरंदर सोशल मिडियाचे सचिव स्वप्नील कांबळे आदिंनी सहभाग घत मते मांडली.