Type Here to Get Search Results !

नीरा येथील ज्युबिलंट कंपनीत रात्री उशिरा लागली आग.

   नीरा येथील ज्युबिलंट कंपनीत रात्री उशिरा लागली आग.


नीरेतील लोक भयभीत : कोणतीही अप्रिय घटना नाही.



नीरा : दि.४

       कायम प्रदुषण व धोकेदायक घटना घडत असलेल्या नीरा - निंबुतच्या हद्दीतील ज्युबिलंट कंपनीत शुक्रवारी रात्री उशीरा आग लागली होती. लोकवस्ती शेजारी कंपनीच्या कंपाऊंडच्या आत लोखंडी जिन्यावर सुमरे अर्धा तास ही आग लागल्याचे लोकांना दिसून आले. त्यामुळे लोक भयभीत झाले होते, तर काहिंनी या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रिकरण ही केले. 

 

       नीरा (ता.पुरंदर) येथील वार्ड क्र. ६ शेजारी विविध घातक रसायनांची निर्माती करत असलेल्या ज्युबिलंट इनिग्रेव्हा या कंपनीत कायमच अशा अपघातांच्या घटना घडत असल्याची चर्चा आहे. नीरा वार्ड नं ६ मधील रहिवाशांना असे अपघात आता नित्याचे झाले आहेत. असे अपघात घडल्याचे प्रथम लोकवस्तीत समजते. कंपनीच्या एक टोकाला अपघात झाल्यास स्थनिक लोक कंपनीच्या अधिकाऱ्यांना अशा अपघातांची कल्पना देतात असे स्थानिकांकडून बोलले जात आहे. 


      शुक्रवार दि. ३ जून रोजी रात्री अकराच्या सुमारास कंपनीच्या एका प्लँंटवर जाणाऱ्या लोखंडी जिन्यावर सुमारे अर्धातास ही आग दिसल्याचे स्थानिकांनी सांगितले. असे अनेकवेळा झाले, नशीब चांगले की कोणती जीवीत हानी नाही. तसेच आगीने रौद्र रूप धारण केले नाही , परंतु संकटाची टांगती तलवार सतत वॉर्ड क्रमांक ६ वर असल्याची भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली.


राजकीय वरदहस्ताने चालते ही कंपनी: ग्रामस्थांचा आरोप


    "राजकीय वरदास्ताने ही कंपनी चालते , स्वार्थापोटी सामान्य गोरगरीब जनतेच्या जिवशी खेळ खेळला जातो, यात वापरले जाणारे साधे सोपे simple लॉजिक आहे. Give and Take, setting and Manage."


सचिन मोरे सामाजिक कार्यकर्ते नीरा 


 थोडीच आग लागली होती : कंपनीचा दावा.


   "कंपनीच्या एका उंच भागात पुठे पेटले होते. रात्री वार असल्याने ती मोठी आग असल्याचे भासले. वास्तवीक काही मिनिटात ती आग वाझलीही. यातून कोणीही जखमी झाले नसून, कंपनीचे ही कोणत्याही प्रकारचे नुक्सान झाले नाही. अशा घटनांची काळजी घेण्यासाठी आमच्याकडे सक्षम व आधुनिक फायर यंत्रण असल्याने लोकांनी घाबरु नये"


ईसाक मुजावर जनसंपर्क अधिकारी



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies