पंजाब मधील खुनात पुण्यातील आरोपींचा सहभाग
पोलीस तपासात उधड
पुणे दि. ६
पंजाबमधील सुप्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्ये मध्ये पुण्यातील दोघांचा समावेश असल्याची माहिती आता पुढे येत आहे. या हत्येची कबुली लॉरेन्स यांनी दिली आहे. त्यानंतर या हल्ल्याबाबत नवनवीन खुलासे होण्यास सुरुवात झाली आहे.
सुप्रसिद्ध गायक असलेल्या सिद्धू मूसेवाला यांची २९ मे रोजी हत्या करण्यात आली होती. भर दिवसात जीपमधून जात असताना त्याला बंदुकीने गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते.. यानंतर मूसेवाला त्यांच्या जीपमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धू मूसेवाला याच्यावर ज्या आठ जणांनी गोळ्या झाडल्या, त्यापैकी दोघेजण पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी अशी दोघा शूटरची नावं आहेत. मूसेवाला यांची हत्या करण्यासाठी एकूण आठ शूटर वापरण्यात आले होते. त्यापैकी तिघे पंजाबचे, तिन राजस्थानचे आणि दोघे महाराष्ट्राचे होते, असं सांगण्यात येत आहे.