पालखीच्या मार्गातील मांस विक्रीची दुकाने व मद्यालये राहणार बंद
नीरा दि.२२
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा दरम्यान पालखी महामार्गावरील मांसाहारी हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे ग ज्या गावातून पालखी सोहळा जाणार आहे त्या गावातील मांसाहारी हॉटेल मद्यालये मच्छीमार्केट व मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत.
दिनाक २१ मार्च ते २४ जून या दरम्यान पालखी सोहळा मार्गातील मुक्कामाच्या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमात असतात त्यावेळी तिथे मांस विक्रीची दुकाने, मांसाहारी हॉटेल,कत्तलखाने, मच्छीमार्केट, मांस विक्रीची दुकाने बंद ठेवावीत अशी मागणी श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व श्री.संत तुकाराम महाराज संस्थानाने विनंती केली होती. त्याला अनुसरून दोन्ही पालख्यामध्ये भाविकांची संख्या मोठी असल्याने पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल,कत्तलखाने,मच्छीमार्केट,माद्यालये ही पालखी सोहळा पुढे जाई पर्यंत बंद देवण्याबाबत व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.त्यामूळे आता पालखी ज्या गावात असेल तिथे या सर्व गोष्टी विक्री बंद असणार आहेत.