लाखो वारक-यांची उपस्थिती ; श्रींचे चलपादुका पालखीची ग्रामप्रदक्षिणा
आळंदी / प्रतिनिधीं : वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेली गळ्यात तुळशीमाळ,हातात भगव्या पताका मुखाने हरिनामाचा गजर करीत यावर्षी कोरोना महामारीच्या संकटाचे सावट फारसे नसल्याने लाखो भावीकांचे उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात माउलींच्या पालखीचे प्रस्थान भक्ती मार्गाचे दैवत श्री विठ्ठल भगवान पांडुरंगाचे दर्शन आणि वारीला जाण्यास माउली मंदिरातील विना मंडपातून मंगळवारी (दि.२१ ) रात्री 8 ; 30 च्या सुमारास हरिनाम गजरात झाले. यावर्षी प्रस्थानला लाखो वारकरी भाविकांची गर्दी झाल्याने प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. वारकरी,भाविकांचे उपस्थितीत श्रींचे पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवले. आळंदी देवस्थानने प्रस्थान सोहळा थेट प्रक्षेपण व्यवस्था केल्याने लाखो भाविक, नागरिकांना सोहळा आपापल्या घरात राहून सुरक्षित पणे पाहत आनंदवारी सोहळ्याचा आनंद घेण्याची पर्वणी लाभली.
या प्रसंगी शिवसेनेचे खासदार बंडु जाधव,आमदार दिलीप मोहिते, रोहित पवार, श्रीकांत भारती, माजी मंत्री बाळा भेगडे,जिल्हाधिकारी डॉ्.राजेश देशमुख,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांत विक्रांत चव्हाण, उर्जितसिंह शितोळै सरकार, महादजी शितोळे, पालखी सोहळा प्रमुख अँड विकास ढगे पाटील, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर,राजेंद्र आरफळकर , प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त डॉ.अभय टिळक, आळदी नगरपरिषद प्रशासक तथा खेड तहसीलदार वैशाली वाघमारे, माजी नगराध्यक्षा वैजयंता उमर्गेकर, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, प्रेरणा कट्टे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, मानकरी बाळासाहेब कु-हाडे, योगेश आरु, अनिल कु-हाडे, मंडलाधिकारी स्मिता जोशी,दिंडी प्रमुख, फडकरी,दिंंडीकरी, मानकरी यांचे उपस्थितीत झाले. प्रस्थान दिनी श्रींचे पूजेचे पौरोहित्य अमोल गांधी,महेश जोशी,राजाभाऊ थेटे,योगेश चौधरी यांनी केले.
प्रस्थान सोहळ्याचे नियोजन यावर्षी थेट शासनाचे हस्तक्षेपात झाले. शासनाने वारी ला परवानगी दिली. मात्र गर्दी वाढेल या शक्यतेने पोलीस बंदोबस्त मोठा तैनात करीत स्थानीक नागरिकांना रहदारीला गैरसोय झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यावर्षी सोहळ्यावर कोरोना या महामारीचे संकट नसल्याने देखील प्रशासनाने पुरेशी दक्षता व काळजी घेत महसूल व पोलीस प्रशासनाने नियोजन करून आळंदी देवस्थान सोहळ्यातील संबंधित घटकांना विश्वासात घेऊन प्रस्थान पार पडले. प्रशासनास आळंदीकर नागरिक व भाविकांनी ही मोठा प्रतिसाद दिल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविता आले. यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त लावला.
अलंकापुरीत प्रस्थान सोहळ्या पूर्वी परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मंदिरात पहाटे काकडा आरती, पवमान अभिषेक झाला. मंदिरात भाविकांना दर्शनास दुपार पर्यंत सोय करण्यात आली होती. श्रींचे संजीवन समाधी दर्शनास भाविकांनी गर्दी केली.
दरम्यान नऊ वाजता वीणा मंडपात परंपरेने कीर्तन सेवा झाली. दुपारी परंपरेने मंदिरात श्रीनां महानैवेद्य झाला. यासाठी प्रथम सेवेकरी व स्वकाम सेवक यांनी स्वच्छता स्वयंसेवक यांचे माध्यमातून सेवा रुजू केली. मंदिर प्राकार व श्रींचा गाभारा स्वच्छ केला. दरम्यान पाऊणे तींचे सुमारास दींड्या मंदिरात येण्यास हरिनाम गजरात सुरुवात झाली. वारकरी परंपरेच्या संप्रदायीक खेळ,हरिनाम गजराने स्वर टिपेला पोहोचला.मंदिर बाहेर भाविक वारकरी यांची मोठी गर्दी उसळली. दिंड्या सोडण्यास मात्र यावेळी आत येण्यास उशीर झाला. यावर्षी पालखी पायी वारी सोहळा असल्याने सोहळ्यातील इतर कार्यक्रम हरिनाम गजरात झाले. सोहळ्यास यावर्षी परंपरेने सुरुवात झाली. दरवर्षी प्रस्थान दिनी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास श्रींचे रथापुढील आणि रथामागील मानाच्या ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात सोहळ्यातील परंपरे प्रमाणे चोपदार यांचे सूचनां प्रमाणे महाद्वारातून प्रवेश देण्यास सुरुवात झाली.मात्र आत येण्यास विलंब झाला.यावर्षी दिंड्या व संबंधित दिंडी प्रमुख, वारकरी घटकांचे स्थानिक प्रतिनिधी यांना देखील प्रवेश देण्यात आला. दरम्यान श्रींचे मंदिरात माउलींच्या समाधीवर ब्रह्मवृंदाच्या वतीने श्रीनां वैभवी पोशाख झाल्या नंतर श्री गुरू हैबतरावबाबांच्या वतीने माउलींच्या समाधीची परंपरेने आरती हरिनाम गजरात झाली. त्यानंतर माउली संस्थांनचे तर्फे श्रींची आरती करण्यात आली. दरम्यान श्रींचे वैभवी चांदीचे पादुका प्रस्थानासाठी पुष्पसजावटीने सजलेल्या चौथ-या वर वीणा मंडपात ठेवण्यात आल्या. श्रींचे चलपादुकांची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाली. या वेळी सोहळ्यातील नियमा प्रमाणे आळंदी संस्थानच्या वतीने मानकऱ्यांना पागोटे वाटप, श्रीगुरू हैबतरावबाबांच्या वतीने दिंडी प्रमुखांना पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर,बाळासाहेब आरफळकर यांचे हस्ते नारळ प्रसाद वाटप झाले. श्रींचे संजीवन समाधी गाभाऱ्यात आळंदी देवस्थान च्या वतीने परंपरेने मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला.परंपरेने धार्मिक उपक्रम होताच श्रींचे चलपादुका देवस्थान तर्फे पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र व बाळासाहेब आरफळकर यांचे कडे देण्यात आल्या. मालक आरफळकर यांचे नियंत्रणात श्रींचे पादुका पालखीतून मंदिर प्रदक्षिण हरिनाम गजरात झाली. श्रींची वैभवी चलपादुका मालकांकडे हरिनाम गजर करीत पालखीत ठेवूंन विधिवत पूजा होताच श्रींची पालखी आळंदीकर ग्रामस्थ यांनी नाम जय घोष करीत खांद्यावर उचलीत माउलींच्या वारीला जाण्यास वीणा मंडपातून सायंकाळी पंढरी कडे प्रस्थान ठेवले. माऊलींचे पादुकां पालखीची हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर श्रींचे पादुका पालखी सोहळा आजोळघरा लगतच्या जुन्या रामवाड्याचे गांधी वाड्यात दर्शनबारी सभागृहात हरिनाम गजरात आणण्यात आल्या. येथे सोहळ्यातील परंपरांचे पालन करीत समाज आरतीने श्रींचा सोहळा विसावला. येथे गांधी परिवार तर्फे परंपरेने सोहळ्याचा पाहुणचार होत आहे.आळंदीत यावर्षी पहिला एक मुक्काम होत श्रींची पालखी पुढील दोन दिवसांचे मुक्कामासाठी पुण्या बुधवारी ( दि.२२) मार्गस्थ होईल. यावर्षीची पायी वारी असल्याने लाखो भाविकांची सोहळ्यास उपस्थिती राहिली. आळंदी देवस्थान ने श्रींचे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण व्यवस्था केल्याने घरी राहून लाखो नागरिकांना सोहळा पाहता आला. यावर्षी श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा, ग्राम प्रदक्षिणा हरिनाम जय घोषित झाली. आळंदी मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट व आकर्षक रंगावली, मंदिरात व इंद्रायणी नदी घाटावर लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली. नदी घाटावर देहू आळंदी विकास समितीचे वतीने विविध लोकशिक्षण पार कार्यक्रम झाले. विद्युत रोषणाईने भाविकांची मने जिकली. थेट प्रक्षेपण असल्याने नागरिकांनी घरात राहून पालखी सोहळ्याचा आनंद लुटला.
श्रींचे प्रस्थान दिनी मंदिरात श्रींचे पौरोहित्य करण्यासाठी पहाटे काकडा आरती चार वाजता , पवमान अभिषेख व श्रींची पहाट आरती पूजेसाठी श्रीक्षेत्रोपाध्ये पुजारी वेदमूर्ती प्रसाद जोशी, अमोल गांधी, सौरभ चौधरी यांनी तसेच प्रस्थांची मुख्या पूजे साठी योगेश चौधरी,अमोल गांधी, सौरभ चौधरी, महेश जोशी यांनी परंपरेने पौरोहित्य केले.
श्रींचे नगरखान्याचे मानकरी बाळासाहेब भोसले यांनी श्रींचे पालखी प्रस्थान साठी लक्षवेधी नगारखाना सजविला. श्रीचे पालखी व्यापारी तरुण मंडळ माऊली ग्रुप ने तर पालखी रथ सुदीप गरुड आणि परिवाराने सजविला. यावर्षी रथ ओढण्यासाठी सेवा पांडुरंग वरखडे आणि तान्हाजी वरखडे यांनी रुजू केली आहे. श्रींचे वैभवी पालखी रथाला शोभेल अशी आकर्षक बैलजोडी ने रथाचे तसेच सोहळ्याचे वैभव वाढविले आहे. यासाठी सोन्या माउली बैलजोडही यावर्षीची रथ सेवा देणार आहे. श्रींचे सोहळ्यात चवरी ढाळण्याची सेवा योगीराज कुऱ्हाडे यांचे कडे तर अबधागिरी सेवा योगेश आरू, माजी नगराध्यक्ष राहुल चीताळकर पाटील, आरतीचे मानकरी अनिल कुऱ्हाडे यांचे कडे आहे. यावर्षीची परंपरेने श्रींचे सोहळ्यात चोपदार बाळासाहेब रणदिवे यांची सेवा रुजू होत आहे. ताथवडे गावचे प्रगतशिल शेतकरी ह,भ,प, प्रकाश पवार यांचा चार वर्षांचा नातु रुद्रंराज सोमनाथ पवार श्रींचे प्रस्थान दिनी लक्षवेधी वारकरी वेशात सजला होता. श्रींची कोठी सजावट व जमवाजमव अगदी मिठापासून मिरची, हळद, हिंग, मोहरी, सुई दोरा, रथाचे नियोजन पर्यंत वारी सोहळ्यासाठी आवश्यक साहित्य व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांनी संकलन केले.