ती इफ्तार पार्टी देवस्थान समितीने आयोजित केली नाही. जेजुरीतील मार्तंड देवस्थानचा खुलासा
जेजुरी दि.२
मागील महिन्यात १ मे २०२२ रोजी मार्तंड देव संस्थान जेजुरी यांच्या माध्यमातून मुस्लिम धर्मीयांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तशी पोस्ट देखील देवस्थानने सोशल मीडियावर प्रसारित केली. मात्र यानंतर विश्व हिंदू परिषदेने व हिंदू जनजागरण परिषदेने याबाबत आक्षेप घेतल्यानंतर इफ्तार पार्टी मार्तंड देवस्थानच्यावतीने घेण्यात आली नसल्याचा खुलासा संस्थानच्यावतीने धर्मादाय आयुक्तांकडे करण्यात आला आहे.
जेजुरी येथील मार्तंडदेव संस्थांच्यावतीने देव संस्थानला मिळालेल्या निधीतून समाजातील लोकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यामध्ये सर्वधर्म समभावाने काम केले जाते. दिनांक 1 मे रोजी अशाच प्रकारची एक इफ्तार पार्टी मुस्लीम समाजासाठी जेेजुरी येेथे आयोजित करण्यात आली होती. या इफ्तार पार्टीवर झालेल्या खर्चावर हिंदू संघटनांनी आक्षेप घेत धर्मदाय आयुक्तांकडे याबाबतची तक्रार होती. यानंतर याबाबत खुलासा देत मार्तंड देव संस्थांच्यावतीने ही इतर पार्टी आयोजित करण्यात आली नसल्याचा संस्थानच्यावतीने सांगण्यात आले. त्याचबरोबर याबाबतची व्हाट्सअप पोस्ट चुकून पोस्ट झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केले आहे
या इफ्तार पार्टीनंतर हिंदू संघटनांनी या इफ्तार पार्टीवर झालेल्या खर्चावर आक्षेप घेतला होता.हिंदूंनी धार्मिक भावनेने दान दिलेल्या पैशाचा असा गैरवापर करण्याचे कोणते ही हक्क विश्वस्त मंडळास नाहीत आणि हिंदू समाज अशा गोष्टी खपवूनही घेणार नाही. याची जाणीव सदर लोकांना व्हावी यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून धर्मदाय आयुक्त यांचेकडे तक्रार दाखल करण्यात आली होती, हिंदू जनजागर परिषद व विश्व हिंदू परिषदेचे अनेक कार्यकर्ते या विषयात सक्रिय होते. काल दिनांक १ जुन २०२२ रोजी मा. धर्मदाय आयुक्त यांनी दोनीही बाजूचे म्हणने ऐकून घेऊन, मार्तंड देव संस्थान विश्वस्त मंडळाने कोणतेही घटनाबाह्य कृत्य करू नये असे आदेश दिले असून विश्वस्त मंडळाने झालेल्या प्रकाराबद्दल खुलासा व दिलगिरी व्यक्त केली. त्याच बरोबर असे कोणतेही घटनाबाह्य वर्तन त्यांचे हातून होणार नाही अशी लेखी हमी दिली आहे.
दरम्यान अखंड महाराष्ट्राचा लोकदैवत असलेल्या जेजुरीचा खंडोबा अठरापगड जाती आणि विविध धर्मातील लोक पुजत असतात. या देवाच्या यात्रेमध्ये मुस्लिम समाजातील लोकांना देवाला पानाचा विडा देण्याचा मान आहे खंडोबाच्या भक्तीमध्ये मुस्लिम समाजही पिढ्यानपिढ्या असल्याचे पहायला मिळत आहे त्यामुळे खंडोबाचा दारामध्ये अशा प्रकारचा धार्मिक वाद येऊ नये अशी प्रतिक्रिया येथील भाविक भक्तांनी दिली आहे.
"हा कार्यक्रम काही विश्वस्तांनी स्वतःच्या पैशाने आयोजित केला होता.मात्र हा कार्यक्रम देवस्थानने आयोजित केल्याची पोस्ट चुकून पोस्ट झाली होती.त्यामूळे त्याबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आली. देवसंस्थान घटनेत सांगितल्या प्रमाणेच काम करते. खंडोबा देवाच्या सर्व जाती धर्मातील भाविक भक्तांचा आम्ही आदर करतो."
प्रमुख विश्वस्त ; तुषार सहाणे