नीरा येथे राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई ; लाखो रुपयांचा विदेशी दारू केली जप्त
नीरा दि.१६
नीरा ता.पुरंदर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत विदेशी दारूचा मोठा मद्यसाठा जप्त केला आहे. यामध्ये ६६ लक्ष रुपयाची तस्करी करण्यात येत असलेली दारू सह एकूण ९१७७६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार दि.१५ जुन २०२२ रोजी राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षक यांना मिळाल्यालेल्या गुप्त बातमी नुसार पुरंदर तालुक्यातील नीरा गावच्या हद्दीत नीरा - लोणंद रोडवर हॉटेल न्यू प्रसन्ना समोरील रोडवर गोवा राज्यातून विक्री असलेल्या मद्याची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती समजली . त्या अनुषंगाने नीरा गावच्या परिसरातील हॉटेल न्यू प्रसन्न समोरील रोडवर राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक क्रमांक २ पुणे विभागाने सापळा लावला असता मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार भारत बेंज कंपनीचा ट्रक त्यांना दिसून आला. सदर ट्रक चालकास ट्रक रोडच्या कडेला घेण्याचा इशारा केला असता, ट्रकचालकाने सदर रोडच्या कडेला उभा केला. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेला विदेशी मद्यसाठा व बिअरचा साठा ममिळाला त्यावरून ट्रक चालक प्रवीण परमेश्वर पवार वय २३ वर्षे राहणार तांबोळे, तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर याला जागीच अटक करून ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई आयुक्त कांतीलाल उमाप ,संचालक सुनील चव्हाण यांच्या आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त अनिल चासकर, अधीक्षक चरण सिंग बी.राजपूत, उपाधीक्षक संजय आर. पाटील ,युवराज एस शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक २ या पथकाने केली आहे. सदर कारवाई निरीक्षक तानाजी शिंदे,डी. परब, दुय्यम निरीक्षक, बी.बी. नेवसे, जी. नागरगोजे, पी. डी.दळवी,वाय.एस.लोळे, एम.डी.लेंढे, सर्वश्री जवान एस. बी. मांडेकर ,एन.जे. पडवळ,बी. राठोड, एम. कांबळे, बनसोडे ए.यादव, आर. पोटे व महिला जवान मनिषा भोसले यांनी सहभाग घेतला सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक तानाजी शिंदे हे करीत आहेत.