शहरी, निमशहरी भागात वडाच्या झाडाची संख्या घटल्याने महिलांना करावी लागतेय कुंडीतील वडाची पूजा.
आपले कुटुंब एकत्र राहावं त्याच बरोबर निसर्गाचाही संवर्धन व्हाव हा संदेश देणारा वटपौर्णिमेचा सण आज सर्वत्र साजरा होतोय. मात्र शहरी आणि निमशहरी भागांमध्ये वडाची मोठी झाडेच नसल्याने महिलांना नाईलाजाने परंपरा म्हणून कुंडीतील वडाच्या झाडांची पूजा करावी लागतेय
भारतीय संस्कृती नुसार अनेक सन उत्सव व परंपरांचं पालन केलं जातं. यातून कुटुंब व्यवस्था बळकट कशी राहील यासाठी प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर मनुष्य निसर्गाच्या सानिध्यात राहून त्याच्या मनामध्ये निसर्गाबद्दल प्रेम आणि जिव्हाळा वाढावा म्हणून वेगवेगळ्या प्रथा निर्माण केल्याl आहेत.. तिकडे पाश्चात्त्य देशात घटस्फोटाचं प्रमाण वाढत असताना आपल्या देशात मात्र पती-पत्नीचं नातं वृद्धिंगत व्हाव म्हणून वर्षानुवर्षे वटपौर्णिमा सारखे सण साजरे केले जातात. यावेळी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वडाचे झाड म्हणजे २४ तास ऑक्सिजन देणारे आणि सावली देणार झाड मनुष्याच्या आणि प्राण्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त झाड. याचं जतन व्हावे असा संदेश या सणातून दिला गेला आहे. मात्र जशी लोकसंख्या वाढत जाते तस-तशी गावातील वडाच्या झाडांची संख्या सुद्धा संपुष्टात आली आहे. आता तर महिलांना पूजेसाठी सुद्धा वडाचे झाड शहरात दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे महिलांना कुंडीतील वडाच्या झाडाची किंवा फांदीची पूजा करून हा सण साजरा करावा लागतो पुरंदर तालुक्यातील नीरा येथील महिलांनी सुद्धा आज दिनांक 14 जून रोजी कुंडीतील वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची व सात जन्म साथ निभावण्याची मनोकामना व्यक्त केलीय..