आठ वर्षात केंद्र सरकारने केलेली कामे घराघरा पर्यंत पोहचवणार : गंगाराम जगदाळे
भाजप मोटार सायकल रॅलीचे नीरा येथे उत्साहात स्वागत
नीरा दि.१२
केंद्र सरकारने आठ वर्षाच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले .जाणतेसाठी उपयुक्त अशी अनेक कामे केली.ही कामे सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचायला हवीत.त्याचा लाभ आणि त्याची माहिती जनतेला मिळायला हवी, म्हणून आजा भाजपाच्यावतीने दिवे ते नीरा असे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे पुरंदर भाजपचे अध्यक्ष गंगाराम जगदाळे आणि नीरा येथे रॅली च्या समारोपाच्या वेळी म्हटले आहे. गेल्या आठ वर्षांत केंद्र सरकारने केलेली कामे आम्ही लोकांपर्यंत पोहचवणार असल्याचे ते म्हणाले.
पुरंदर तालुक्यात आज (दि.१२) रोजी पुरंदर भाजपाच्यावतीने मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील दिवे ते नीरा अशा मार्गावर पुरंदर भाजपचे अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती.यामध्ये अनेक तरुणांनी सहभाग घेतला सासवड, जेजुर, वाल्हा, नीरा या प्रमुख शहरा बरोबरच अनेक गावातून या रॅलीचे स्वागत करण्यात आले.
नीरा येथे भाजपचे आमदार राम सातपुते भाजपचे तालुका उपाध्यक्ष सुरेंद्र जेधे ,नाना जोशी, आण्णा माने, यांच्यासह अनेक मान्यवरांनी रॅलीचे स्वागत केले.
नीरा येथे बोलताना भाजपचे पुरंदर तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे म्हणाले की,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ८ वर्ष पूर्ण होत आहेत. आठ वर्षात या सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेला व्हावी म्हणून ही रॅली आयोजित करण्यात आली होती.यामध्ये पुरंदर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला तालुक्यात भाजपचे पाठबळ वाढत आहे
दरम्यान दिवे येथे भाजपचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी रॅलीचा शुभारंभ केला या वेळी जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, सरचिटणीस कैलास जगताप, संदीप नवले, संदीप कटके, ओबसी सेलचे अध्यक्ष रवी फुले, युवा मोर्चा अध्यक्ष विठ्ठल जगताप,किसन सेलचे अध्यक्ष गोविंद भोसले, अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे सुनील आवचळे, सासवड शहर अध्यक्ष साकेत जगताप, जालिंदर जगताप, आनंद जगताप, कामगार आघाडीचे आबा घाटे, इत्यादी सह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.