Type Here to Get Search Results !

येत्या रविवारी होणार नवीन सरकारचा शपथ विधी?

 येत्या रविवारी होणार नवीन सरकारचा शपथ विधी?

 फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर



 मुंबई दि.२३


            शिवसेनेमध्ये बंडाळी करून बाहेर पडलेले शेनेचे गटनेते एकनाथ खडसे यांनी वेगळी चूल मांडलीआहे. त्यामुळे राज्यांमध्ये नवीनच सरकार स्थापन होणार असे स्पष्ट झाले. हे सरकार रविवारपर्यंत स्थापन होईल आणि या सरकारचा शपथविधी या रविवारी होईल अशा हालचाली आता सध्या सुरू झालेल्या आहेत.

           महा विकास आघाडीचे सरकार जाणार हे आता निश्चित झाले आहे. त्यानंतर आता भाजपच्यावतीने सरकार स्थापण्यासाठीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. येत्या रविवारी भाजपचं सरकार राज्यात येईल याबाबतच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. भाजपच्यावतीने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणीस आणि अजित पवार यांनी 2019 मध्ये स्थापन केलेल्या 80 तासांच्या सरकारमध्ये अजित पवारांना जी ऑफर दिली होती तीच ऑफर भाजपने शिंदे यांना दिली आहे. शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदासह बारा मंत्रिपदे मिळतील अशी शक्यता आहे. शिंदे गटाला मंत्रिमंडळाकडून मंत्रिमंडळाच्या एकूण क्षमतेच्या 25% खाते मिळणार असल्याची माहिती समोर येते आहे तर दहा जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांचा शिंदे गटाला पाठिंबा आहे. त्यासाठी या मंत्र्यांना नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. 


      शिवसेनेचे एकामागून एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गोटात जात असतानाच कॉंग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे. दरम्यान सरकार कोसळण्याची वेळ आल्यास मध्यावधी निवडणुका नको. असा सूर काँग्रेसच्या आमदारांकडून येत आहे. वेळ पडल्यास विरोधी बाकावर बसून अशी मागणी काँग्रेस आमदारांनी कमलनाथ यांच्याकडे केली आहे. विधानसभा बरखास्त करू नका अशी मागणी कॉंग्रेसच्या कडून करण्यात येतेत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies