पिंपरे खुर्द येथे आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
मृत देहाची ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन
नीरा दि.१०
नीरा नजीक पिंपरे येथे ८ जून रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृत देह आढळून आला होता. मात्र या मृताची ओळख पटवण्यासाठी अद्याप कोणीही पुढे आले नाही त्यामूळे नीरा पोलीस स्टेशनचे हवालदार संदीप मोकाशी यांनी
ज्या लोकांच्या घरातील व्यक्ती हरवली असेल त्यांनी जेजुरी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
पुरंदर तालुक्यातील नीरा नजीक पिंपरे खुर्द येथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होत. दिनांक 8 जून रोजी पिंपरे खुर्दचे पोलीस पाटील रूपाली सोनवणे यांनी नीरा येथे पोलिसांना या अनोळखी मृत देहाबाबतची माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी पिंपरे खुर्द येथील विराज हॉटेल समोर जेजुरी-निरा रोडच्याकडेला जाऊन पाहिले असता अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयाचे पुरुषाचे प्रेत पोलिसांना आढळून आले. हे प्रेत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मृत व्यक्तीला ओळखणारे अद्याप कोणीही आढळून आले नाही. या व्यक्तीने अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला असून. त्याची दाढी व केस वाढलेले आहेत. या वर्णनाची कोणाची व्यक्ती हरवली असल्यास त्यांनी जेजुरी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.