भोंडवे आणि बुवा शिंदे यांचा सेवा पूर्ती गौरव समारंभ.
जेजुरी : दि.१
उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, पुणे उपविभाग नाझरे येथे पांडूरंग भोंडवे आणि बुवा शिंदे यांचा सेवा पूर्ती गौरव समारंभ नाझरे येथील शाखेत संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर उप अभियंता रंगनाथ भुजबळ, अनिल घोडके, अविनाश कांबळे, अलोक भोफळे, रुपाली मुळे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात पांडूरंग भोंडवे आणि बुवा शिंदे यांचा सेवापुर्ती निमित्त जेजुरी शाखेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात उप अभियंता रंगनाथ भुजबळ, शिवराज चांदगुडे, विश्वास पवार, दत्तत्रय रोटे, त्रिंबक कदम यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रम प्रसंगी आकाश चाचर, शशिकांत कड, हरीश भोंगळे, विठ्ठल टाक, विशाल गोरड, रोकडे , लडकत उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना पांडूरंग भोंडवे आणि बुवा शिंदे यांनी आपल्या सेवेच्या काळात सहकाऱ्यांनी भरभरून प्रेम केल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली मुळे, स्वागत अनिल घोडके यांनी तर आभार त्रिंबक कदम यांनी मानले.