रेल्वे प्रशासनाने हटवली वाल्हे येथील रेल्वेच्या जागेतील अतिक्रमणे
वाल्हे (दि.१९)
मागील अनेक वर्षांपासून, वाल्हे (ता.पुरंदर) येथील रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून शेकडों गोरगरीब कुटूंबांनी संस्कार थाटले हाेते. रेल्वे प्रशासनाने, अतिक्रमणधारकांना वारंवार नोटीस बजावण्यात आल्या होत्या. दरम्यान, गुरूवार (दि.१९) सकाळ पर्यंत रेल्वेची जागा मोकळी करून देण्याबाबत अवधी देण्यात आला होता.
गुरूवार (दि.१९) सकाळपासूनच रेल्वेचे, असिस्टंट डिव्हिजनल इंजिनिअरिंग सातारा विभाचे एस .के. सिंग, व सिनियर शेषन इंजिनिअरिंग ओ पी एस यादव यांनी पोलीस बंदोबस्तात रेल्वेच्या अतिक्रमण झालेली जागा मोकळी करून घेण्यासाठी धडक कारवाई सुरू केली. दरम्यान, या परिसरात मागील अनेक वर्षांपासून अनेक व्यावसायिकांकडून मोठ्या टपऱ्या टाकून व्यवसाय सुरू होता. तसेच अनेकांनी तात्पुरत्या स्वरूपातील झोपडी - वजा घरे बांधून, कुटूबांसह राहत होते.
गुरूवारी सकाळपासूनच रेल्वे प्रशासनाकडून होत असलेल्या धडक कारवाईने व्यावसायिक व रहिवाशांची काही वेळ धांदल उडाली होती. मात्र, रहिवाशी व व्यावसायिकांकडून रेल्वे प्रशासनास अतिक्रमणांवर कारवाई न करता थोडा वेळ आम्हाला द्यावा. व आम्ही स्वतःच हटवितो. अशी विनंती केल्यानंतर, रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमणावर बुलडोझर चालवला नाही. सर्वच अतिक्रमण धारकांकडून जलद गतीने रेल्वेची जागा मोकळी करून देण्यातची घाई करू लागले. अनेकांनी मिळेल त्या वाहनातून आपल्या घर- संसार व दुकानातील साहित्य हटविले. तसेच तात्पुरत्या स्वरूपातील उभारलेल्या घरांचे पञे, चॅनेल, अॅगल स्वतःच काढून घेत होते. तसेच काहींनी क्रेन च्या सह्याने, टपरी उचलून दुस-या ठिकणी हलवून रेल्वे प्रशासनाला जागा मोकळी करून देण्यात आली.