चुकून पडलेल्या क्षेपणास्त्र प्रकरणी अमेरिकेनं दिला भारताला थेट इशारा.म्हणाले.......
नवी दिल्ली. दि.२६
अमेरिकेनं नुकताच एक अहवाल जारी केलाय. यात त्यांनी म्हटलं आहे की, चीन, भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांना आण्विक देशांमधील युद्धाचे धोके आणि परिणामांची चांगली जाणीव आहे. दक्षिण आशियातील वाढत्या राष्ट्रवादामुळं युद्धाची ठिणगी पडू शकते, असं अहवालात म्हटलं आहे. हा अहवाल यूएस इन्स्टिट्यूट ऑफ पीसनं तयार केला आहे.
मार्च २०२३ मध्ये भारतच एक क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडलं होत.या अहवालात घटनेचाही उल्लेख करण्यात आला आहे. दक्षिण आशियातील बदलत्या परिस्थितीमुळं निर्माण होणाऱ्या आव्हानांचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे. त्याच बरोबर भारत-पाकिस्तान यांच्यातील आण्विक धोका कमी करण्यावर भर देण्याचं आवाहन अमेरिकेला करण्यात आले आहे.
अमेरिकेला भारतासोबत संरक्षण सहकार्य वाढवण्याची गरज असल्याचं अहवालात म्हटले आहे. USIP अहवालात बायडन प्रशासनाला तालिबानसोबत चालू असलेल्या चर्चेचा उपयोग अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील प्रादेशिक स्थिरतेला धोका कमी करण्यासाठी करण्याची सूचित करण्यात आले आहे. चीन, भारत आणि पाकिस्ताननं शत्रूंना दूर ठेवण्यासाठी अण्वस्त्रं विकसित केली आहेत. परंतु, सुरक्षेबाबत नेहमीच शंका उपस्थित केल्या जात असल्याचा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.