तक्रारवाडी येथील अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू
जेजुरी दि.१
पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे आज सकाळी दोन दुचाकींचा अपघात झाला होता. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर जेजुरी येथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते . मात्र आज दुपारी या तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.तर अन्य तिघे जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
, आज दिनांक १ मे रोजी सकाळी साडे आकरा वाजलेच्या सुमारास पुणे पंढरपूर मार्गावर जेजुरी सासवड दरम्यान शिवरी नजिक असलेल्या तक्रारवाडी येथे हा अपघात झाला होता. यामध्ये पिंगोरी येथील विकास गणपत शिंदे वय ४२ वर्ष हे गंभीर जखमी झाले होते तर त्याच्याबरोबर प्रवास करणारे प्रकाश शिंदे किरकोळ जखमी झाले होते. तर दुसऱ्या मोटार सायकल वरील विनायक तांबे याचा हात मोडला आहे.त्यांच्या बरोबर असलेले अक्षय ढोकरे याच्या डोक्याला मार लागला असून ते दोघेही शुद्धीवर आहेत. त्यांच्यावर जेजुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विकास शिंदे यांच्या मृत्यू मुळे पिंगोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.ते आज त्यांच्या त्यांच्या भावकीतील एका व्यक्तीच्या वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाला येत होते.मात्र त्याच वेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला.