पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक
पुणे दि.२६
पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आणि व्यवसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. अविनाश भोसले यांची यापूर्वी किडीने चौकशी केली होती. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून अविनाश भोसले यांचा शोध ते घेत होते. इडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत भोसले यांची चौकशी केली होती.
गेल्या काही दिवसापासून भोसले यांच्या घरी छापे टाकण्यात आले होते. अविनाश भोसले यांना अटक केल्यानंतर काय कारवाई करणार हे येणाऱ्या काळातच समोरील येईल. ईडीने गेल्या वर्षी अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त केली होती. डीएचएफएल प्रकरणात सी बीआय कडून त्याचा शोध घेतला जात होता. त्यांना आज (दि.२७) पुण्यात अटक करण्यात आली. अविनाश भोसले यांच्यावर इडीने गेल्यावर्षी कारवाई केली होती. भोसले यांची 40 कोटींची संपत्ती गेल्यावर्षी जूनमध्ये जप्त करण्यात आली होती.
त्यांच्या व्यावसायिक भगिदरांवर देखील छापे टाकण्यात आले होते. डीएचएफएल लोन प्रकरणी अविनाश भोसले यांच्यावर सीबीआयने ही कारवाई केली आहे.