पिंपरे खुर्द येथे ट्रॅक्टर चालकाला टॉमीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी
नीरा दि.८
पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द गावाच्या हद्दीत ट्रॅक्टर ट्रकला घासल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून ट्रॅक्टर मालक त्यासोबतच्या सात ते आठ जणांनी ट्रक चालकाला टॉमिने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून यासंदर्भात अनिल एकनाथ गार्डी वय ४३ वर्षे धंदा-शेती,रा.जेऊर ता.पुरंदर जि.पुणे यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी जेजुरी पोलीसांनी भारतिय दंड विधान कलम १४३,१४७,१४८,१४९,३२४,३२३,५०६,४२७, अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ६/५/२०२२ रोजी दुपारी ४.३० वा.चे सुमारास मौजे पिंपरे खुर्द गावचे हद्दीत जेजुरी रेल्वे गेट क्रँस करून जेजुरी निरा रोडचे कडेला यातील आरोपी कृष्णा लहु विघ्ने, दादा ज्ञानदेव विर, लहु निवृत्ती विघ्ने, सोनी कृष्णा विघ्ने, छाया लहु विघ्ने, दादा ज्ञानदेव विर,योगेश लहु विघ्ने, शैला बबन सानप सर्व सध्या रा.सोमेश्वर कारखाना ता.बारामती जि.पुणे मुळ रा.वंजारवाडी ता.शिरुर (कासार ) जि.बिड यांनी फिर्यादीचे मालकीचा ट्रक नं. एम.एच ०९ जे ६६१५ यास ट्रॅक्टर एम.एच.११ सी.क्यु १४५७ हा उजवे बाजुस घासुन गाडीची पार्कींग लाईट तुटली त्यावेळी त्यास फिर्यादी हे विचारण्यास गेला," की तुझ्या ट्रॅक्टरने माझे गाडीची पार्कींग लाईट तुटली आहे" .असे विचारले त्यावेळी ट्रॅक्टर चालक कृष्णा लहु विघ्ने याने शिवीगाळ करुन त्याचे ट्रॅक्टर मध्ये असलेली टॉमी हातात घेवून ट्रॅक्टर मधुन खाली उतरुन फिर्यादीचे डोक्यात मारली व इतर आरोपी यांनी बेकायदा गर्दी जमाव जमवून त्यांना हाताने व लाथा बुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवून दुखापत केली असल्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबतचं तपास जेजुरी पोलीस करीत आहेत.