Type Here to Get Search Results !

जेजुरी सोमवती यात्रेच्या अनुषंगाने रविवार व सोमवारी चालकांनी पर्यायी बाह्यवळणाचा वापर करावा

जेजुरी सोमवती यात्रेच्या अनुषंगाने रविवार व सोमवारी चालकांनी पर्यायी बाह्यवळणाचा वापर करावा जेजुरी पोलिसांचे आवाहन 



जेजुरी   वार्ताहर  दि २८  

       महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा दि ३० रोजी भरत असून या यात्रेस मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने जेजुरीत वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी पुणे,लोणंद,बारामती कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी रविवार दि 29 व सोमवार दि 30 रोजी  पर्यायी बाह्यवळण मार्गाचा वापर करावा असे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी केले आहे.

   कोरोना संकटाच्या काळानंतर अडीच वर्षांनी जेजुरी शहरात खंडोबा देवाचा सोमवती यात्रा सोहळा होत आहे.  या सोहळ्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असून या निमित्ताने शहरात वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी बाह्यवळण मार्गे वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्याहून बारामती कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी बेलसर-कोथळे,नाझरे कडेपठार ते बारामती तसेच बारामतीकडून पुण्याकडे जाणाऱ्यांनी मोरगाव मार्गे नाझरे कडेपठार-कोथळे-बेलसर- ते सासवड मार्गाने प्रवास करावा . फलटण, लोणंद, नीरा कडून पुणे कडे जाताना जेऊर-मांडकी-वीर – सासवड मार्गे प्रवास करावा असे आवाहन जेजुरी पोलिसांनी केले आहे.

      रविवार व सोमवारी यात्रे निमित्त भाविकांची गर्दी होणार असून जेजुरी बसस्थानक,नंदीचौक परिसर,बाणाईदेवी मंदिर,घोड्याची पागा,मुख्य मंदिराचा दरवाजा,मंदिरा समोरील कासव तसेच गर्दीच्या ठिकाणी भाविकांचच्या खिशातून बगेतून,पैसे,दागिने,मोबाईल,आदी मौल्यवान वस्तू व्यवस्थित सांभाळून दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी केले आहे.

   या सोमवती यात्रेचे नियोजन करण्यासाठी आठ पोलीस अधिकारी,१२० पोलीस कर्मचारी बंदोबस्तआठी तैनात करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies