केतकी चितळेचा जेल मुक्काम वाढला, आजही जामीन अर्ज फेटाळला
मुंबई दि.२६
अभिनेत्री केतकी
चितळे हिच्यावर कळवा पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यात तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह
पोस्ट केल्यामुळे कळवा पोलिसांत केतकीवर गुन्हा दाखल झाला आहे. अत्यंत गंभीर
स्वरुपाचा गुन्हा असल्याचे कारण देवून ठाणे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच रबाळे पोलिस स्टेशन अंतर्गत अॅट्रोसिटी प्रकरणी जामिनाबाबत
अद्याप पोलिसांचा जबाब येणे बाकी आहे. सध्या केतकी चितळे ही ठाणे न्यायालयीन
कोठडीत म्हणजे ठाणे कारागृहात आहे. या काही आक्षेपार्ह पोस्टमुळे गेल्या अनेक
दिवासांपासून अभिनेत्री केतकी चितळे ही वादात सापडली आहे. केतकीवर महाराष्ट्रात
अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केतकीविरोधात महाराष्ट्रभर
गुन्हे दाखल
गेल्या काही दिवसांत केतकी चितळेविरोधात जवळपास राज्यभर गुन्हे दाखल
झाली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट
केल्याप्रकरणी तिच्यावर जवळपास २० ठिकाणांहून जास्तठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र फक्त याच प्रकरणात
नाही तर केतकी चितळेविरोधात आणखीही काही वादग्रस्त पोस्टच्या प्रकरणात गुन्हे दाखल
झाले आहेत. त्यामुळे आता केतकीच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. त्याही प्रकरणात
पोलीस केतकीला आता ताब्यात घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाणे पोलिसांनंतर एका
अॅट्रोसिटीच्या प्रकरणात केतकीचा ताबा रबाळे पोलिसांनी घेतला होता. त्यामुळे आता
पुढेही इतर पोलीस तिचा ताबा घेण्याची शक्यता आहे.
केतकी चितळेची जेलवारी कधी
संपणार?