मारहाणीत मृत्यू गराडे येथील एकाचा मृत्यू सासवड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल
सासवड दि.८
चांबळी तास.पुरंदर येथे गराडे येथील एकाला दोघांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सासवड पोलिसात फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम ३०२ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या संदर्भात गरडे येथे राहणारे २३ वर्षीय सोमनाथ अंकुश जगदाळे, यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी सचिन उर्फ कपिल सुदाम कामठे,वय २७ वर्षे,
व गणेश नवनाथ कामठे,वय 24 वर्षे, दोघे रा. चांबळी, ता.पुरंदर, जि.पुणे यांनी दिनांक ७/५/२०२२ रोजी रात्री ८ वाजालेच्या पूर्वी मयत राजेश रोहीदास ताठीले,वय २८ वर्षे, रा. गराडे, ता.पुरंदर, जि.पुणे यांना चंबळी येथील पुणे जिल्हा बॅकेच्या समोरसमोर जबर मारहाण केली. फिर्यादी यांनी त्यास सुरुवातीस चांबळीतील धायगुडे डॉक्टरांकडे नेले. त्यांनी त्यास पुढे घेवुन जाणेस सांगितले.त्यास सासवड येथील मोरया हॉस्पीटल येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी त्यास मयत घोषीत केले. आरोपी सचिन कामठे आणि गणेश कामठे यांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे त्यांना दिनांक ११ मे पर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली असून त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. याबाबत आज दिनांक ८ मेरोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतचा अधिकचा तपास सासवड पोलीस करीत आहेत.